इंटिमेट सीनबद्दल...

सयानी गुप्ताने अलीकडेच एका बोल्ड आणि इंटिमेट सीनबद्दल आश्चर्यकारक गोष्ट शेअर केली आहे. ती म्हणाली की, बोल्ड सीन्सचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Wed, 27 Nov 2024
  • 07:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सयानी गुप्ताने अलीकडेच एका बोल्ड आणि इंटिमेट सीनबद्दल आश्चर्यकारक गोष्ट शेअर केली आहे. ती म्हणाली की, बोल्ड सीन्सचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, कट म्हटल्यावरही एक अभिनेता तिला सतत किस करत राहिला.

अनेक वेळा महिला कलाकारांना अशा सीनचे शूटिंग करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा असे घडते की सीन कट झाल्यानंतरही कलाकार बोल्ड सीनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. एकदा मी इंटिमेट सीन शूट करत असताना एका सहकलाकाराने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शकाने कट सांगितल्यानंतरही अभिनेत्याने माझे चुंबन घेणे थांबवले नाही. अनेक लोक इंटिमेट सीन्सचा गैरफायदा घेतात. अभिनेत्यांनी असे वागणे अयोग्य आहे, असे सुहानीने सांगितले.

संवादादरम्यान सयानीने आणखी एक किस्सा शेअर केला. त्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत होते. सयानीने सांगितले की, 'फोर मोअर शॉट्स प्लीज'च्या पहिल्या सीझनच्या शूटिंगदरम्यान, 'मला छोटा ड्रेस घालून समुद्रकिनारी वाळूवर झोपावे लागले. यावेळी माझ्यासमोर क्रूसह जवळपास ७० लोक होते. त्यावेळी मला खूप असुरक्षित वाटायचे.
 
सयानीने सांगितले, ‘‘काही काळापूर्वीची गोष्ट आहे. सेटवर फारसा स्टाफ नव्हता. त्यादिवशी 800 एक्स्ट्रा आर्टिस्ट आले होते आणि शूटिंगच्या वेळी मला एक शाल हवी आहे असे वाटले. पण, कधी कधी असे घडते की आम्ही इतक्या लवकर शूट करतो की कोणीही सुरक्षिततेचा विचार करत नाही. केवळ इंटिमेट सीनमध्येच तुम्हाला अस्वस्थ वाटत असेलच असे नाही, तर काही वेळा तुमच्या मर्यादांशी तडजोडही केली जाते. ही एक सामान्य मानसिकता आहे, जी सुधारणे आवश्यक आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story