श्रुतीचे सिक्रेट मॅरेज?
सालार (Salar) चित्रपटात प्रभाससमवेत असलेल्या श्रुती हासनची (Shruti Haasan) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. कमल हासन- सारिका या जोडप्याची कन्या असलेली श्रुती गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये चमकत आहे. शंतनू हजारिकाला डेट करणाऱ्या ३७ वर्षीय श्रुतीने गुपचूप लग्न केल्याचे वृत्त आहे. पापाराझींच्या आवडत्या ओरीने हे संकेत दिले असून त्याने शंतनूचे वर्णन श्रुतीचा पती असे केले आहे.
अलीकडेच ओरी ऊर्फ ओरहान अवतारमणीचे इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन झाले. त्यात असा कोणी सेलिब्रिटी आहे का ज्याने तुमच्यासोबत फोटो क्लिक करण्यास नकार दिला आणि उद्धटपणा दाखवला, असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. त्यावर उत्तर देताना ओरीने श्रुती हासनचे नाव घेतले. तो म्हणाला, मी कधीच तिला फोटो क्लिक करायला सांगितले नाही, आम्ही एका कार्यक्रमात भेटलो. तेथे ती माझ्यासोबत उद्धटपणे वागत होती. मी तिला ओळखतही नव्हतो. मला वाटतं काही गैरसमज झाला असावा. तसे पाहायला गेले तर मी तिच्या पतीला चांगला ओळखतो आणि त्याला पसंत करतो. आमचा गैरसमज ताबडतोब दूर झाला. नंतर मला कळले की तिने मला प्यून किंवा स्पॉटबॉय म्हटले होते.
श्रुती हासनचा प्रियकर शंतनू हा कलाकार आहे. दोघेही जवळपास ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही काळापूर्वी श्रुतीने एका मुलाखतीत बॉयफ्रेंड आणि लग्नाविषयी मते मांडली होती. ती म्हणाली होती, शंतनू माझा चांगला मित्र आहे. तो एक प्रतिभावान कलाकार आहे. कला, संगीत, सिनेमा अशा अनेक क्षेत्राबाबतचे आमची विचार जुळतात. त्यामुळे मला त्याच्यासमवेत वेळ घालवायला आवडते. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. तथापि, लग्नाबाबत मी सांगू इच्छिते की सध्या माझा असा कोणताही विचार नाही. सध्या श्रुती हासन प्रभाससोबत सालार पार्ट-१: सीझफायर या चित्रपटात दिसत आहे. याशिवाय ती द आय आणि डकोइटमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.