'मेहंदी वाला घर' मालिकेत काम करणारा अभिनेता करण मेहरा म्हणतो
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर अलीकडेच सुरू झालेली 'मेहंदी वाला घर' ही मालिका उज्जैनमधल्या अग्रवाल कुटुंबाची एक हृदयस्पर्शी कथा सांगते. कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत दाखवताना ही कथा प्रतिकूल परिस्थितीत हे कुटुंब एकसंध राहू शकेल का ही उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात जागी करते. व्यक्तीवाद आणि आधुनिकीकरणाच्या नावाने हे बंध तोडून एकमेकांपासून दूर झालेल्या कुटुंबाला कोणत्या परिणामांना तोंड द्यावे लागते, याचाही शोध ही मालिका घेते. सध्या सुरू असलेल्या कथानकात प्रेक्षकांनी पाहिले की, कधी गुण्या-गोविंदाने नांदणारे अग्रवाल कुटुंब काही परिस्थितीमुळे कसे एकमेकांपासून दुरावले आहे आणि नात्याचे बंध तोडून दूर जाऊ लागले आहेत. आणि आता आपल्या लाडक्या मनोज (करण मेहरा) पापांसाठी हे तुटलेले बंध पुन्हा जुळवण्याचा निर्धार मौलीने केला आहे. करण मेहराने मालिकेचे कथानक, आपली व्यक्तिरेखा मनोज अग्रवाल याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
मनोज एक ‘आदर्श मुलगा’ आहे, ज्याच्या साठी आपले कुटुंब हेच सर्व काही आहे. तो महत्त्वाकांक्षी पण शांत स्वभावाचा आहे. त्याच्या गोड स्वभावामुळे त्याची भावंडे आणि ताऊजी व जानकी मां यांचा तो सगळ्यात लाडका आहे. आपल्या कुटुंबाची मान ताठ करण्यासाठी त्याला डॉक्टर बनायचे असते, पण काही परिस्थितीमुळे, अजंता या आपल्या प्रेमासाठी त्याला घर सोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागतो. त्याच्या या निर्णयामुळे उज्जैनच्या त्याच्या घरात खूप संघर्ष होतो. कथानक पुढे सरकते, आणि मनोजला कौटुंबिक नात्यांचे महत्त्व उमगते. अखेरीस तो मौलीच्या मदतीने आपली चूक दुरुस्त करून पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतो. मौलीला तो आपल्या स्वतःच्या मुलीसारखीच वागणूक देतो.
एका संयुक्त कुटुंबाभोवती फिरणारे हे कथानक मला फार आवडले. ही कहाणी अगदी खरीखुरी वाटते, कारण आपल्यापैकी बरेच जण अशाच कुटुंबात वाढलो आहोत. ते दिवस पुन्हा जगत असल्यासारखे मला वाटले. आणि या व्यक्तिरेखेचे माझ्याशी बरेच साम्य आहे. मालिकेचे शूटिंग सुरू करण्याअगोदर आम्ही संहितेचे वाचन केले आणि आमच्या क्रिएटिव्ह टीम आणि दिग्दर्शक सचिनसोबत काही सत्रे केली, ज्यात त्यांनी आम्हाला मौलिक मार्गदर्शन केले. हळूहळू करत आम्ही सर्वांनी मिळून ही व्यक्तिरेखा उभी केली. ही संपूर्ण प्रक्रिया अशी होती.
या मालिकेच्या माध्यमातून आम्ही आपल्या कौटुंबिक नात्यांचे महत्त्व आणि त्यांची ताकद यावर भर दिला आहे. आवश्यकता असेल तेव्हा कुटुंब कसे पाठीशी उभे राहते हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जे आजच्या वेगवान युगात अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. ऐक्याची लक्षणीयता दाखवून देण्यावर आणि परिस्थिती कोणतीही असो, तुमचे कुटुंब तुमच्या सोबत असतेच हा संदेश अधोरेखित करण्यावर या मालिकेचा भर आहे. हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आम्ही कसून प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की, प्रेक्षक आमच्याइतकेच या विषयाशी तद्रूप होतील! बघत रहा, 'मेहंदी वाला घर' दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.