संदीप रेड्डी वांगाने बॉलिवूडच्या 'किंग खान' वर साधला निशाणा
आठशे कोटींहून अधिक कमाई या चित्रपटानं केल्यानं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्या चित्रपटाचं नाव न घेता शाहरुखनं त्यावर निशाणा साधला होता.शाहरुखच्या त्या प्रतिक्रियेवर आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वांगाच्या वादात आणखी एका वादाची भर पडली आहे. त्यावर वांगानं शाहरुखवर प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी अॅनिमलवर गीतकार जावेद अखतर, कंगना रनौत, कोंकणा सेन शर्मा आणि किरण राव यांनी टीका केल्याचे दिसून आले. संदीपनं सिद्धार्थ काननला एक मुलाखत दिली होती. त्यावर त्यानं वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केली. मी रणबीर कपूरला प्रमाणापेक्षा जास्त ग्लोरिफाईड केलं असं म्हटलं जातं. त्यावर दिग्दर्शकानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, लोकांना ग्लोरिफिकेशनचा अर्थ समजत नाही. त्यातून वेगळ्या प्रकारच्या चर्चेला सुरुवात होते. काही वेळेला त्यातून अनेक चुकीचे गैरसमजही होत असल्याचे दिसून आले आहे.
प्रेक्षकांना वाटते की, हिरो सगळ्यात शेवटी येणार आणि आम्हाला काही सांगणार. जिथं तो त्याच्या सगळ्या चुका मान्य करेल. त्याच्यासोबत सगळं काही चांगलं होईल. त्यांना असे वाटेल की, अब ये कुत्ते की मौत मर जाए... तेव्हा लोकांना असे वाटते की, त्याच्यासोबत चांगले झाले. नॉर्मल लोकांना सोडा पण मोठमोठ्या सेलिब्रेटींना देखील ती गोष्ट कळत नाही. असे रेड्डी वांगानं सांगितलं. काय बोलला होता शाहरुख?
शाहरुख खानच्या वक्तव्याविषयी बोलायचे झाल्यास त्यानं निगेटिव्ह रोल्स करण्याविषयी त्याचं मत मांडलं होतं. मी असा माणूस आहे जो माणसांना नव्या आशा आणि आनंदाच्या गोष्टी सांगू पाहतो. जो हिरोची भूमिका साकारतो आणि चांगली कामं करतो. प्रेक्षकांना आनंद देतो. त्यांच्या मनाला समाधान देतो. जर मी वाईट काम करणार तर मी नक्कीच कुत्ते की मौत मरेल. कारण मला असे वाटते की, चांगुलपणाच दुसऱ्या चांगल्या गोष्टींना बळ देतो. आणि वाईटपणाला लाथ बसते. अशा शब्दांत शाहरुखनं त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.