समांथाचा चै टॅटू
लंडनमध्ये सिटाडेलच्या प्रीमिअरला समांथा रुथ प्रभूने लावलेल्या हजेरीची इंटरनेटवर सध्या जोरदार चर्चा आहे. काळ्या आणि तांबड्या रंगातील ड्रेसमधील समांथाने तेथे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असले तरी काही चाणाक्ष चाहत्यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही. ही गोष्ट म्हणजे तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यचा तिच्या अंगावर असलेला टॅटू. तिच्या शरीराच्या उजव्या भागावर नागा चैतन्यमधील चै ही अक्षरे गोंदलेली असून ते दोघे वेगळे झाले तरी ही अक्षरे अद्याप कायम आहेत.
सिटाडेलच्या प्रीमिअरला हजर राहिलेल्या समांथाने तेथील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील काही फोटोमध्ये तिच्या अंगावर नागा चैतन्यच्या नावातील चै ही टॅटू केलेली अक्षरे अजूनही कायम आहेत. नागा चैतन्य आणि समांथा आता वेगळे झाले असले तरी समांथाने चै ही अक्षरे अद्याप दूर केलेली नाहीत. शाकुंतलममधून अलीकडेच चाहत्यांना भेटलेल्या समांथाचा चित्रपटसृष्टीत ये माया चेसावे या चित्रपटातून प्रवेश झाला. त्यावेळी तिचा नायक हा नागा चैतन्य होता. येथूनच त्यांच्या प्रेमकथेला प्रारंभ झाला होता. त्याची आठवण म्हणून समांथाने आपल्या मानेवर वायएमसी ही अक्षरे टॅटू केलेली होती. काही दिवसांपूर्वी समांथाने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनी थिंग हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चाहत्यांसाठी आयोजित केला होता. त्यावेळी एका चाहत्याने टॅटूबाबत काही सुचवण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी त्याला सल्ला देण्याऐवजी तिने कोणीही टॅटूच्या फंदात पडू नये असे मत मांडले. या वेळी तिने थेट काही सुचवले नसले तरी तिला अप्रत्यक्षपणे सल्ला द्यावयाचा असेल. ती आपल्या चाहत्याला म्हणाली की, मी माझ्यापेक्षा कमी वयाच्या चाहत्यांना असे सांगेन की त्यांनी टॅटूच्या फंदात पडू नये. कधीच पडू नये. सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीत समांथा वरुण धवनसोबत काम करत आहे. त्याचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केली आहे. रुसो बधूंच्या एजीबीओ कंपनीतर्फे या मालिकेची निर्मिती केली जात असून त्याची कथा हेरगिरीवर आधारित आहे. सिटाडेलच्या हॉलिवूड आवृत्तीत रिचर्ड मॅड्डेन आणि प्रियांका चोप्रा जोनास मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडेच पडद्यावर आलेल्या शाकुंतलमला फार प्रतिसाद मिळालेला नाही. तीन दिवसांत त्याने बॉक्स ऑफीसवर केवळ तीन कोटी मिळवलेले आहेत. तिचा आगामी चित्रपट विजय देवरकोंडा आणि खुशीसमवेत असून ती एक वेगळी प्रेमकथा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.