सलमान-आमिर एकत्र
बांद्रा येथे शनिवारी सलमान खानची बहीण अर्पिता आणि तिचा नवरा आयुश शर्मा यांनी ईदनिमित्त दिलेल्या पार्टीला सारे बॉलिवूड हजर होते, असे म्हटले तर गैर होणार नाही. पार्टीमध्ये सलमान, आमिर खान, कार्तिक आर्यन, कॅटरिना कैफ, संगीता बिजलानी, पूजा हेगडे, शहनाज गिल, आयुष्मान खुराना, साक्षी धोनी, इब्राहीम अली खान, अनिल कपूर, तब्बू, एम. सी. स्टॅन आदींसह अनेकांनी हजेरी लावली होती. सलमानच्या उपस्थितीत होणाऱ्या पार्टीकडे आपल्याकडे कोणाचे लक्ष जाऊ नये असे काेणाला वाटणारी नाही. यामुळे चमचमत्या, झगमगत्या वातावरणातील पार्टीला आलेले सारे जण आपल्या सिग्नेचर फॅशन स्टाईलमध्ये आले होते.
या पार्टीतील अनेक फोटो रविवारी इंटरनेटवर व्हायरल झालेले आहेत. एका फोटोमध्ये सलमान आणि आमिर खान एकत्र आलेले दिसत होते. तीन खान मंडळीत सलमान, आमिर आणि शाहरुख यांचा समावेश होतो. या तिघांनी बॉलिवूडवर राज्य केले असले तरी तिघे फार क्वचित एकत्र आल्याचे पाहावयास मिळते. फार फार दोघे एकत्र आल्याचे पाहावयास मिळते. अर्पिताच्या पार्टीत सलमान आणि आमिर एकत्र आल्याने त्यांच्या चाहत्यांचे लक्ष जाणे स्वाभाविक होते. सलमान आणि आमिर एकत्र आल्याचा फोटो व्हायरल झाल्यावर इंटरनेटच्या मायाजालात त्याचीच चर्चा होती. भाग्यश्रीची कन्या अवंतिका दासानी आणि मोहनिश बहलची कन्या प्रनूतन बहल समवेत सलमानने फोटोसाठी वेगवेगळी पोझ दिली. प्रनूतनने हा फोटो शेअर केला असून त्यात ती म्हणते की, मैने प्यार किया आजच्या काळातील. जीवनची कन्या आणि सुमनच्या कन्येसमवेत प्रेम.# ईद.
सुसान खानची बहीण फराह अली खाननेही आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तब्बू, अलविरा अग्निहोत्री, संगीता बिजलानी, दिया मिर्झा, नीलम कोठारी यांच्यासमवेत दिसत आहे. या साऱ्याजणींनी पारंपरिक ड्रेस घातलेले आहेत. दरम्यान ‘किसी का भाई, किसी की जान’ ईदनिमित्त प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे यश साजरे करण्यात सलमान खान सध्या मग्न आहे. फरहाद सामजीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, राघव ज्युएल, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला आदींच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे समीक्षकांनी संमिश्र स्वागत केले असले तरी प्रेक्षकांनी मात्र चित्रपट उचलून घेतल्याचे दिसते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.