सई, पापराझी आणि तो फोटो !

सईची पापराझी सोबत धमाल

Sai,paparazzi

सई, पापराझी आणि तो फोटो !

काही दिवसापूर्वी सईच्या " श्री देवी प्रसन्न " चित्रपटाचा प्रीमियर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. रेड कार्पेट वर असलेली सेलिब्रिटी ची चंगळ आणि सईच्या या सगळ्यातला तिचा पापराझी सोबतचा फोटो चर्चेचा विषय ठरला. कुठलाही इव्हेंट असो हल्ली पापराझी हे प्रत्येक इव्हेंट चा अविभाज्य भाग बनले आहेत. पापराझी सोबतची ही धमाल मस्ती एका खास व्हिडिओ मध्ये कैद झाली आणि सई पापराझी सोबतच खास नात यातून दिसून आल.

कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी सई ताम्हणकर बॉलिवुड मध्ये सुद्धा चर्चेत आली ती म्हणजे " भक्षक " या चित्रपटामुळे. नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळवलं आणि सईच्या अनोख्या भूमिकेन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या गोड स्वभावाने सई कायम प्रेक्षकांची मन जिंकत असते आणि म्हणूनच सई सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे यात शंका नाही. 

2024 वर्षात दमदार भूमिका करून मराठी सोबत बॉलिवुड मध्ये आपल्या अभिनयाची छाप तिने पाडली आहे आणि येणाऱ्या काळात ती अजून उत्तम प्रोजेक्ट मधून दिसणार आहे. मराठीच्या सोबतीने बॉलिवुड मध्ये दमदार परफॉर्मन्स करून सई बॉलिवुड ची फेवरेट अभिनेत्री ठरतेय. 

पापराझी हे कायम सगळ्यांचं कलाकारांचे लाडके असतात त्यांना सोशल मीडिया वरून कायम चर्चेत ठेवतात आणि अश्याच पापराझी सोबत सई च नात काही औरच आहे यात शंकाच नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story