रिचाकडे गुड न्यूज!
लग्नाच्या चार वर्षांनंतर ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील. खुद्द रिचा आणि अली यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.अलीने शुक्रवारी (दि. ९) सकाळी इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले. एका चित्रात १+१=३ असे लिहिले होते आणि दुसऱ्या चित्रात रिचा आणि अली एकत्र पोज देताना दिसत होते. या पोस्टसोबत कॅप्शन लिहिले आहे... ‘‘एक लहान हृदयाचा ठोका हा आपल्या जगातील सर्वात मोठा आवाज आहे!’’
या पोस्टमुळे दोघेही लवकरच पालक होणार असल्याची पुष्टी झाली आहे. रिचा आणि अली यांची पहिली भेट २०१२ मध्ये ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रिपोर्ट्सनुसार, रिचानेच अलीला प्रपोज केले होते. ऋचाच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी अलीला तीन महिने लागले. दोघांनीही जवळपास पाच वर्षे आपले नाते गुपित ठेवले होते. व्हिक्टोरिया आणि अब्दुलच्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये दोघांनीही आपले गुप्त नाते अधिकृत केले.
रिचा आणि अली यांनी मार्च २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर दोघांनीही रितीरिवाजांनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र महामारीमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली जात होती. मग शेवटी २०२२ मध्ये रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह विधी पार पाडले. या जोडप्याचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे फक्त मेहंदी, संगीत आणि इतर विधी नंतर केले गेले.
कामाबाबत बोलायचे झाल्यास रिचा ही संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी दिसणार आहेत. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, अली फजल ‘मिर्झापूर ३’ आणि ‘मेट्रो इन डिनो’मध्ये दिसणार आहे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.