राजकुमार रावने केली प्लास्टिक सर्जरी

दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव काही दिवसांपूर्वी त्याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत होता. राजकुमारने प्लास्टिक सर्जरी केली का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला होता. बदललेल्या लूकवरून राजकुमारला बरेच ट्रोलसुद्धा करण्यात आले होते. त्यावर आता अभिनेता इमरान हाश्मीने प्रतिक्रिया दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 1 Aug 2024
  • 01:55 pm
Actor Rajkummar Rao, powerful acting skills, changed look, Rajkumar did plastic surgery, Now actor Emraan Hashmi has reacted to it.

संग्रहित छायाचित्र

दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव काही दिवसांपूर्वी त्याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत होता. राजकुमारने प्लास्टिक सर्जरी केली का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला होता. बदललेल्या लूकवरून राजकुमारला बरेच ट्रोलसुद्धा करण्यात आले होते. त्यावर आता अभिनेता इमरान हाश्मीने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरानला कलाकारांच्या प्लास्टिक सर्जरीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. कलाकार प्लास्टिक सर्जरीचा पर्याय का निवडतात? दिसण्याबाबतची असुरक्षितता कुठून निर्माण होते, असा प्रश्न इमरानला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तराची चर्चा होत आहे. प्लास्टिक सर्जरीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर इमरानने मुलाखत घेणाऱ्याला सर्जरी केलेल्या एखाद्या कलाकाराचे नाव घेण्यास सांगितले.

जेव्हा राजकुमारचे नाव घेतले गेले,  तेव्हा इमरान म्हणाला, “होय, ही रिॲलिटी आहे. मी इथे कॉस्मेटिक बिझनेसविषयी बोलतोय. हे फक्त इंडस्ट्रीतच नाही तर त्यांनी या गोष्टीचे मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे केले गेले आहे. प्रत्येकाला पोस्टर बॉय किंवा पोस्टर गर्लसारखे दिसायचे आहे. सौंदर्य म्हणजे काय, याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे, बरोबर ना? आणि म्हणूनच तुम्हाला त्या साच्यात स्वत:ला बसवायचे असते.  कारण त्यामुळे तुम्हाला इतरांकडून प्रेम मिळते आणि तुम्हाला स्वत:बद्दल चांगले वाटू लागते.

राजकुमार रावने एका मुलाखतीत प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा फेटाळल्या होत्या. “मी कोणत्याच प्रकारची प्लास्टिक सर्जरी केली नव्हती. तो फोटो जर तुम्ही पुन्हा पाहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की काय फरक आहे? गेल्या १४ वर्षांत तोच एक फोटो इतका वेगळा कसा काय आहे? दुसरा कोणताच फोटो तसा नाही. माझ्या मते तो फोटो एडिट केलेला असावा, कारण त्यात माझी त्वचा एकदम नितळ दिसतेय. ते पाहून मी सुद्धा थक्क झालो होतो की माझी त्वचा इतकी नितळ कशी काय दिसू शकते? तेसुद्धा कोणत्याही मेकअपशिवाय आणि दिवसभर शूटिंग करूनही, असेही तो म्हणाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story