परिणितीचे स्वप्न!
बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांची १३ मे रोजी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट झाली. या सोहळ्यातील फोटो आणि व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता या जोडप्याने पुन्हा एकदा एंगेजमेंटचेच पण व्हायरल झालेले नाहीत असे फोटो सोशल मीडियावर टाकलेले आहेत. यामध्ये दोघेही कधी हसताना तर कधी भावूक होताना दिसतात.
दोघांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. या फोटोत दोघेही एकमेकांच्या मिठीत आहेत. जणू ते नव्या आयुष्याची स्वप्ने पाहात आहेत. त्याचबरोबर एका फोटोत परिणिती तिच्या होणाऱ्या सासूवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. दुसऱ्या फोटोत प्रियांका चोप्रा लहान बहिणीच्या पतीचे कुटुंबात स्वागत करताना पाहावयास मिळते. यात राघव चढ्ढाच्या कपाळावर टिका लावत आहे. यातील एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यात परिणितीच्या डोळ्यात पाणी आहे. ती राघवसोबत असली तरी आनंदाच्या क्षणात ती भावूक झालेली दिसते. परिणितीने या फोटो कॅप्शनमध्ये आपली प्रेमकथा सांगतिली आहे. ती म्हणते की, आम्ही ब्रेकफास्ट केला आणि कळले की मला तो भेटला आहे. सर्वात अद्भुत माणूस, शांत आणि प्रेरणादायक. त्याचा पाठिंबा, विनोद, बुद्धी आणि मैत्री हा निखळ आनंद आहे. तो माझे घर आहे. आमची एंगेजमेंट पार्टी एक स्वप्नवत होती. प्रेम, हास्य, भावना आणि नृत्यामधील एक स्वप्न! आम्ही प्रियजनांना बाहुपाशात घेत आनंद साजरा केला. भावना ओसंडून वाहात होत्या.
एका लहान मुलीला राजकन्येच्या कथेचे वेड लागलेले असताना, माझी परिकथा कशी सुरू होईल याची मी कल्पना केली. आता ते पूर्ण झाले आहे, हे माझ्या कल्पनेपेक्षा चांगले आहे. त्यातच अभिनेत्री परिणिती चोप्रा दिल्लीहून मुंबईत परतली असून पापाराझ्झींनी तिला क्षणात क्लिक केले आहे. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.