न्याराचे स्टंट !
स्टंटवर आधारित खतरों के खिलाडी या मालिकेचा १३ वा भाग थरारक दृश्यांसह प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. नव्या कल्पनेसह तयार केलेला हा भाग अधिक भव्य, थरारक आणि साहसी असणार आहे. या मालिकेतील सहभागी स्पर्धक विविध घटनांतून भयावर किंवा भीतीच्या भावनेवर कशी मात करतात याचा प्रवास म्हणजे ही मालिका म्हणता येईल. समाजाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा या मालिकेत समावेश असून आयुष्यात अपवादाने येणाऱ्या घटनांवर ते साहसाने, धाडसाने, शौर्याने कशी मात करतात याचे चित्तथरारक चित्रण पाहण्यास तुम्ही नक्कीच उत्सुक झालेले असाल. आता या थरारक प्रवासात भाग घेण्यास ‘पिशाच्चिनी’ गाजवणारी अभिनेत्री न्यारा बॅनर्जी सज्ज झाली आहे. खतरों के खिलाडी १३ चे न्यारा एक आकर्षण असेल.
न्यारा बॅनर्जी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री असून रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी १३ मधून ती आपणाला साहसी आणि थरारक दृश्यांमध्ये सहभागी झाल्याचे पाहावयास मिळेल. न्याराच्या अभिनयावर प्रेक्षक फिदा असून आता थरारक दृश्यांमध्ये ती काय कमाल दाखवते ते पाहायला चाहते आतूर आहेत. यातील प्रत्येक भागात सहभागी होण्यासाठी न्याराला मजबूत रक्कम मिळालेली आहे. एका वृत्तानुसार न्याराने एका भागासाठी सहा लाखाची रक्कम घेतलेली आहे. तुमचा या आकड्यावर कदाचित विश्वास बसला नसला तरी तिला मिळणाऱ्या रकमेचा आकडा हा नक्की तोच आहे. याचा अर्थ असा आहे की, न्यारा बॅनर्जी एका आठवड्याला १० ते १६ लाखांपर्यंतचे मानधन घेईल. अर्थात, अशा बातम्यांची खातरजमा होत नसली तरी चर्चा मात्र नक्कीच होत असते. अशा चर्चेत तथ्य हे नक्कीच असते. खतरों के खिलाडी १३ मध्ये असणारे १४ स्पर्धक असे आहेत- डेझी शहा, अर्जित तनेजा, शिझान खान, रुही चतुर्वेदी, रोहित बॉस रॉय, राश्मित कौर, अंजुम खान, अंजली आनंद, शिव ठाकरे, सौंदौस मुफाकिर, न्यारा बॅनर्जी, अर्चना गौतम, ऐश्वर्या शर्मा अणि डिनो जेम्स. यातील स्पर्धक पहिले पाच दिवस दक्षिण आफ्रिकेतील जंगलात साहस दृश्यांमध्ये भाग घेतील. एका खात्रीलायक वृत्तानुसार रोहित शेट्टीची ही मालिका कलर्सवर रात्री साडेनऊ वाजता दिसणार असून त्याचा प्रारंभ १७ जुलैपासून होईल. असे असले तरी स्पर्धक आणि मालिकेच्या प्रदर्शनाच्या तारखेस दुजोरा मिळालेला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.