नोज वॉर !
शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणून जसे ओळखले जाते. तसेच त्याला किंग ऑफ रोमान्स म्हणूनही ओळखले जाते. चित्रपटाच्या पडद्यावर शाहरुख जेव्हा नायिकेसमवेत प्रेमप्रसंग रंगवत असतो तेव्हा प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन क्षणाक्षणाला वाढत असते. प्रत्येक चित्रपटात त्याचे उत्कंठ प्रेमाचे प्रसंग हमखास असतात. मात्र, रईसमध्ये त्याने अभिनेत्री माहिरा खानसमवेत चित्रित केलेल्या प्रेमप्रसंगाची कथा काही वेगळीच आहे. २०१७ मध्ये हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील शाहरुख आणि माहिरा खानच्या केमिस्ट्रीची चर्चा जोरदारपणे रंगली होती. विशेष म्हणजे चित्रपट समीक्षकांनीही आपल्या परीक्षणात त्याचा विशेष उल्लेख केला होता. अनुपमा चोप्रा यांच्या ऑल अबाऊट मूव्हिज या कार्यक्रमात माहिरा खानने याबद्दल एक वेगळी माहिती दिली. जालिमा या गाण्याच्या शाहरुख खान बरोबर झालेल्या चित्रिकरणावेळच्या नोज वॉरचा मजेशीर किस्सा तिने ऐकवला.
प्रेमप्रसंगाचे चित्रिकरण करताना शाहरुख खान काही विशिष्ट गोष्टी करत असे. यावरून माहिरा शाहरुखला चिडवत असे. माहिरा याबाबत म्हणते की, जेव्हा आम्ही जालिमाचे चित्रिकरण करत होतो, त्यावेळी मी घाबरत असल्याने माझी खिल्ली उडवली जात असे. प्रेमप्रसंगावेळी आपल्या हातून उद्धेशाशिवाय काही आगळीक घडते की काय याविषयी मी साशंक होते. त्यामुळे मी शाहरुखला सांगत असे की येथे तू माझा किस घेऊ नकोस, तसे तू करू शकत नाहीस. त्यावेळी थट्टेत शाहरुख म्हणत असे की क्या हो गया है. त्या वेळी तो चेष्टेने म्हणत असे की, ओ, पता है, नेक्स सीन कौनसा है. माहिरा पाकिस्तानी असल्याने तिच्यावर काही बंधने होती. त्यामुळे शाहरुख आणि माहिरामधील जालिमातील हूक स्टेप कशा होणार याची निर्मात्यांना चिंता लागून राहिली होती. त्यावेळी असे ठरविण्यात आले की नोज टू नोज किसिंग सीन घ्यावयाचा.
शाहरुख खान सध्या ॲटली दिग्दर्शित जवान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामध्ये नयतारा, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर शाहरुख सध्या तापसी पन्नू समवेत डुंकीचे शूटिंग करत आहे. शाहरुखची कन्या सुहाना या वर्षी द आर्चिसमधून बॉलिवूड प्रवेश करत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन हा देखील दिग्दर्शक म्हणून प्रवेश करत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.