नाव्याचे डेटिंग ?
अमिताभ बच्चन यांची नात नाव्या नवेली नंदा हिचा चित्रपटसृष्टीशी दुरान्वयाने संबंध नाही. असे असले तरी तिची लोकप्रियता एखाद्या बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेली नाव्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून नाव्या आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या डेटिंगच्या बातम्या झळकत आहेत. यावर दोघांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नसले तरी त्यांची चर्चा तर होणारच. त्यांच्या
डेटिंगच्या अफवांना सुरुवात झाली जेव्हा ते बांद्रा येथील एका कॅफेच्या बाहेर एकत्र दिसले तेव्हा. या वेळी नाव्याने आपला चेहरा लपवला होता, त्यानंतर एका पार्टीतही ते एकत्र दिसले होते. इतकेच नाही तर नाव्याची आई श्वेता बच्चन-नंदा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही सिद्धांत दिसला होता.
त्यामुळे हे दोघही रिलेशनशीपमध्ये आहेत अशा चर्चा सुरू झाल्या तर नवल काय? आता मात्र दोघांनीही पहिल्यांदाच गोव्यात सुटी साजरी केली आहे. ते दोघंही एकत्र परतले आणि पापाराझ्झींनी त्यांना विमानतळावर अचूक हेरले. त्यावेळी त्यांनी काढलेले फोटो आणि व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यावेळी नाव्या आणि सिद्धांत दोघेही पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत
आहेत. हा व्हीडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्याने त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. व्हीडीओमध्ये हे जोडपे खूप क्यूट दिसत असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.