नीतू यांचा १७ कोटींचा नवा फ्लॅट

अलिया भट्ट सध्या गुकी क्रूझ २०२४ ला हजर असल्याने मोठ्या चर्चेत आहे. तेथील तिचे फॅशन स्टेटमेंट बनणारे ड्रेस सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. अलिया चर्चेत असली तरी तिच्या सासूबाई म्हणजे नीतू कपूर सिंग म्हणजे अभिनेता रणबीर कपूरच्या मातोश्री या देखील चर्चेत आहेत. नीतू कपूर सिंग यांनी नुकताच एक फ्लॅट खरेदी केला आहे. डिअर जिंदगी है मध्ये अभिनय करणाऱ्या नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 19 May 2023
  • 02:57 pm
नीतू यांचा १७ कोटींचा नवा फ्लॅट

नीतू यांचा १७ कोटींचा नवा फ्लॅट

अलिया भट्ट सध्या गुकी क्रूझ २०२४ ला हजर असल्याने मोठ्या चर्चेत आहे. तेथील तिचे फॅशन स्टेटमेंट बनणारे ड्रेस सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. अलिया चर्चेत असली तरी तिच्या सासूबाई म्हणजे नीतू कपूर सिंग म्हणजे अभिनेता रणबीर कपूरच्या मातोश्री या देखील चर्चेत आहेत. नीतू कपूर सिंग यांनी नुकताच एक फ्लॅट खरेदी केला आहे. डिअर जिंदगी है मध्ये अभिनय  करणाऱ्या नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे.

 उपलब्ध माहितीनुसार नीतू कपूर सिंग यांनी गजबजलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. हा फ्लॅट चार बेडरूमचा असून त्याची किमती १७ कोटी असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या जुग जुग जिओ चित्रपटातून नीतू कपूर यांनी पुनरागमन केले आहे. आता त्यांनी खरेदी केलेला फ्लॅट हा १७ किंवा १९ व्या मजल्यावर आहे. सनटेक रिॲलिटीच्या सिग्निया आयसलमध्ये ही प्रॉपर्टी आहे. नोंदणी कार्यालयातील माहितीनुसार नीतू कपूर यांनी फ्लॅट खरेदी मूल्यावर आधारित १ कोटी ४ लाखांचा कर भरला आहे. १० मे रोजी नोंदणी झालेल्या या प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ ३ हजार ३८७ एवढे असून त्याच्यासमवेत तीन कार पार्किंग मिळालेली आहेत.  

सासूबाईंनी एवढी कामगिरी करण्यापूर्वी अलियानेही महिन्यापूर्वी बांद्रा भागात काही फ्लॅट घेतले होते. बांद्रा पश्चिममध्ये अलियाने २ हजार ४९७ चौरस फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट घेतला असून त्यासाठी ३७ कोटी ४० लाख रुपये मोजले आहेत. हा फ्लॅट अलियाच्या प्रॉडक्शन हाऊसने घेतला आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार पाली हिलवरील एरिअल को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हा फ्लॅट असून त्याच्या खरेदीवेळी २ कोटी २६ लाखांचा कर अलियाने भरलेला आहे. १० एप्रिलला याची खरेदी नोंदणी झाली आहे. याशिवाय अलियाने आपली बहीण शाहिन भट्टला दोन सदनिका भेट म्हणून दिल्या आहेत. त्याची किमत ७ कोटी ६८ लाख एवढी आहे. हे फ्लॅट जुहूमधील गिगी अपार्टमेंटमधील आहेत.        

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story