'ना उम्र की सीमा हो'
असे त्याच्याकडे बघून वाटणार देखील नाही. इतका तो फिट आहे. मी बोलतेय ते मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणबद्दल.तरुणांना लाजवेल असा फिटनेस असलेल्या अभिनेता मिलिंद सोमणची पत्नी मॉडेल अंकिता कोंवर देखील फिटनेसच्या बाबतीत काही कमी नाही. या दोन्ही फिटनेस प्रेमी कपलची लव्हस्टोरी देखी ल तितकीच रंजक आणि फिल्मी आहे. प्रेमाला वयाचे आणि कशाचेही बंधन नसते, प्रेम हे प्रेम असते या वाक्याचा प्रत्यय या जोडीकडे पाहिल्यावर येतो. अंकिता आणि मिलिंदची पहिली भेट ही एका नाईट क्लबमध्ये झाली होती. या नाईट क्लबमध्ये दोघांची एकमेकांवरची नजर काही हटत नव्हती. शेवटी अंकितानेच मिलिंदला हिंमत करून डान्ससाठी विचारले. यावर मिलिंदने होकार दिला. त्यानंतर, या दोघांनी एकमेकांसोबत बराच वेळ डान्स केला. मनसोक्त डान्स केल्यानंतर शेवटी मिलिंदने अंकिताला तिचा मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर, मोबाईलद्वारे दोघांचे संभाषण वाढले आणि त्यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला.
मिलिंद-अंकिताने पहिल्या भेटीतच एकमेकांसोबत मोबाईल नंबर शेअर केले होते. त्यानंतर, त्यांचे फोनवरून बोलणे सुरू झाले. काही दिवसांनी त्यांची मैत्री एवढी घट्ट झाली की, या दोघांना एकमेकांशी बोललल्याशिवाय अजिबात करमत नव्हते. त्यानंतर, अंकिताच्या आयुष्यात एक दुर्दैवी प्रसंग ओढावला. अंकिताच्या प्रियकराचा काही कारणांमुळे मृत्यू झाला होता. ज्यामुळे, तिच्या आयुष्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खामुळे अंकिताला स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नव्हते.
या दु:खद प्रसंगी मिलिंदने अंकिताची साथ सोडली नाही. तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. एक मित्र म्हणून मिलिंदने त्याची जबाबदारी निभावली. याच दरम्यान मिलिंद आणि अंकिताची मैत्री आणखी घट्ट झाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.