MIRROR MASALA: सईचे स्वप्न सत्यात

मुंबईमध्ये स्वत:चे हक्काचे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. मुंबईत येणारा प्रत्येकजण स्वत:च्या घराचे स्वप्न उराशी बाळगून असतो. सिने क्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या कलाकारही अनेक स्वप्न घेऊन या स्वप्ननगरीत येतात

Sai Tamhankar

संग्रहित छायाचित्र

मुंबईमध्ये स्वत:चे हक्काचे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते.  मुंबईत येणारा प्रत्येकजण स्वत:च्या घराचे स्वप्न उराशी बाळगून असतो. सिने क्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या कलाकारही अनेक स्वप्न घेऊन या स्वप्ननगरीत येतात. प्रचंड मेहनतीच्या जोरावर ती पूर्णही करतात. असेच एक नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar)… मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सईने नाव कमावले आहे. या सगळ्यात सईने तिच्या पर्सनल लाईफमध्येही मोठी ॲचिव्हमेंट मिळवली आहे. सईने मुंबईत अलिशान घर खरेदी केले आहे. या घराचे खास व्हीडीओही सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही दिवसांआधी सईने नवे घर घेत असल्याचे जाहीर केले.  जुन्या घरातून नव्या घरात जात असतानाचा व्हीडीओ सईने शेअर केला. यात तिने जुन्या आणि नव्या घराबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे माझे ११ वे  घर आहे. याआधी दहा घरांमध्ये राहिली आहे. घर म्हणजे माझ्यासाठी एक भावना आहे. भिंतींनी घर बनत नाही तर त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळे घर बनते. या माझ्या घराने माझे यश पाहिलेय. माझे अपयशही पाहले आहे.  या घराशी मी अनेकदा गप्पा मारल्यात… माझ्या हितगुजाच्या गोष्टी मी या घराला सांगितल्या आहेत. (Sai Tamhankar New House)

हे घर सोडणे माझ्यासाठी प्रचंड कठीण आहे. मात्र कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावे लागणार आहे, असे जुने घर सोडताना सई म्हणाली. नव्या घराचा व्हीडीओ सईने शेअर केलाय. यात तिने हे घर तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. नवे घर घेणे सगळ्यांसाठीच एक स्वप्न असते. तसे ते माझ्यासाठीही होते. सांगलीतून मुंबईत आल्यावर मी ते स्वप्न पाहिले होते. मात्र ते कसे पूर्ण होणार आहे हे मला माहिती नव्हते. खूप मेहनत घेतली. त्यानंतर हे घर खरेदी केल्याचे सई म्हणाली.

हे नवे घर अजूनही माझे असल्यासारखे वाटत नाही. असे वाटते की उद्या या घरातून चेकआऊट करून बाहेर जावे लागणार आहे. हे घर मला प्रचंड आवडलेय. माझ्या आवडीनुसार मी हे घर सजवले आहे. मला मोठी झाडे आवडतात. तशी झाडे  मी या घरात ठेवली आहेत. मला स्वत:चा प्रचंड अभिमान वाटतो. जर सई तिचे स्वप्न पूर्ण करू शकते, तर तुम्हीही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता, असे सई म्हणाली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest