मेगा स्टार अभिनेता विजय सेतुपती यांनी मेरी ख्रिसमस च्या प्रेस मीटमध्ये अभिनेत्री कतरिना कैफच्या उत्कृष्ट कामगिरीचे केलं कौतुक
अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजय सेतुपतीने चित्रपटाच्या सेटवर कैटरीना कैफच्या अपवादात्मक अभिनय कौशल्याबद्दल आणि अतुलनीय व्यावसायिकतेबद्दल प्रशंसा केली.
कतरिनाच्या अभिनय कौशल्याची आणि व्यावसायिकतेची प्रशंसा करताना तो म्हणाला, "कतरिना ची काम करण्याची पद्धत पाहून मी थक्क झालो आहे. ती एक उत्तम व्यावसायिक आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला." या पत्रकार परिषदेत "नजर तेरी तुफान" हे गाणं प्रदर्शित करण्यात आल. प्रख्यात संगीतकार प्रीतम चक्रवर्ती आणि गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी संगीतबद्ध केलेल हे खास गाणं प्रसिद्ध गायक पापोन यांनी गायलं आहे. कतरिनाच्या तमिळ पदार्पणासाठी हा चित्रपट उल्लेखनीय ठरणार आहे.
श्रीराम राघवन दिग्दर्शित "मेरी ख्रिसमस," 12 जानेवारी, 2024 रोजी हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी मध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिन्नू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत आहेत. तर तमिळ मध्ये कतरिना आणि विजय सेतुपतीसह राधिका सरथकुमार, गायत्री, षण्मुगराजन, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स दिसणार आहेत. ज्यामुळे स्क्रीनवर डायनॅमिक आणि वैविध्यपूर्ण कलाकार बघायला मिळणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.