पुलवामाला भेट देऊन शहीद जवानांना मानुषी ने वाहिली श्रद्धांजली

रिलीजच्या अगोदर मानुषी छिल्लर "ऑपरेशन व्हॅलेंटाईन" टीम सोबत पोहचली पुलवामाला

ManushipaidtributevisitingPulwama

पुलवामाला भेट देऊन शहीद जवानांना मानुषी ने वाहिली श्रद्धांजली

मानुषी छिल्लर 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन' हा  आगामी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाली असून या चित्रपटात मानुषी आणि वरुण तेज यांच्या मुख्य भूमिका दिसणार आहेत. ऑपरेशन व्हॅलेंटाईनच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असून प्रेक्षक या साठी उत्सुक आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑपरेशन व्हॅलेंटाइनची संपूर्ण टीम ने जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट दिली आणि या भीषण हल्ल्यात प्राण गमावलेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ऑपरेशन व्हॅलेंटाईनबद्दल हा चित्रपट हवाई दलातील योद्धा आणि त्यांच्या देशाच्या संरक्षणासाठी केलेल्या अपार जिद्दीची कहाणी आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा चित्रपट दिग्दर्शक शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी दिग्दर्शित केला असून आहे आणि वरुण तेज सोबत मानुषी छिल्लर हे प्रमुख आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story