मानुषी छिल्लर च्या "ऑपरेशन व्हॅलेंटाइनचा " ट्रेलर लॉन्च

मानुषी छिल्लर चा पहिला तेलगू चित्रपट "ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा " ट्रेलर लॉन्च

ManushiChhillar's"OperationValentine"trailerlaunch

मानुषी छिल्लर च्या "ऑपरेशन व्हॅलेंटाइनचा " ट्रेलर लॉन्च

मानुषी छिल्लरचा बहुप्रतिक्षित हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपट ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा ट्रेलर लाँच आज हैदराबादमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. मानुषी चिल्लरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे आणि  म्हणून हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. 

ऑपरेशन व्हॅलेंटाईनच्या ट्रेलरने उच्च-ऑक्टेन ड्रामाची झलक दाखवून दिली आहे. भारताने पाहिलेल्या भयंकर हवाई हल्ल्यांपैकी एकाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट दोन भाषांमध्ये येणार आहे. हा चित्रपट अनोखी गोष्ट दाखवणार तर आहे सोबतीला एक अनोखी प्रेमकहाणी आहे.  उच्च-ऑक्टेन ॲक्शन सीक्वेन्सपासून ते असुरक्षिततेच्या हृदयस्पर्शी क्षणांपर्यंत, मानुषी तिच्या पात्रातील गुंतागुंत सहजतेने दाखवून देते प्रत्येक फ्रेमसह प्रेक्षकांना मोहित करते. 

चित्रपटाच्या ट्रेलर लाँच नंतर मानुषी म्हणते " ट्रेलर बघून खूप आनंद झाला प्रेक्षकांचं प्रेम आणि सगळ्यांचा पाठिंबा हे माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीम कडून मिळणारा पाठिंबा हा खूप काही देणून जाणारा आहे या चित्रपटासाठी मी स्वतः ह खूप उत्सुक आहे. तेलगू सिनेमातून प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी खूप आतुर आहे " 

ऑपरेशन व्हॅलेंटाइन मधून तिची एक अभिनेत्री म्हणून असलेली तिची अष्टपैलुत्व दाखवत नाही तिच्या अभिनयाची अनोखी बाजू दाखवून देतात. ट्रेलर लाँचचा शेवट टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात पार पडला. मानुषी, कलाकार आणि क्रू आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची खास पोच पावती आहे. शक्ती प्रताप सिंग दिग्दर्शित आणि सोनी पिक्चर्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट 1 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story