दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ...

अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. माधुरी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. माधुरी सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो आणि व्हीडीओ शेअर करते.

Madhuri Dixit

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. माधुरी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. माधुरी सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो आणि व्हीडीओ शेअर करते. नुकताच माधुरीने एका मराठी गाण्यावरील डान्सचा व्हीडीओ शेअर केला. तिच्या या व्हीडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

माधुरी दीक्षितने 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ'  या गाण्यावरील डान्सचा व्हीडीओ शेअर केला आहे. या  व्हीडीओमध्ये माधुरी ही खास लूकमध्ये दिसत आहे. डोळ्यावर गॉगल, मोकळे केस आणि लाल ड्रेस अशा लूकमध्ये माधुरी दिसत आहे. या व्हीडीओला माधुरीने कॅप्शन दिले आहे, "राजा फोटो माझा काढ".

'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल'  हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक जण या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गायक संजू राठोडचे हे गाणे युट्यूबवरील ५५ टॉप म्युझिक व्हीडीओमध्ये ट्रेंड होत आहे. संजू राठोडच्या 'नऊवारी साडी पाहिजे' या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे गुलाबी साडी हे गाणे रिलीज होऊन एक महिना झाला आहे. आतापर्यंत या गाण्याला १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. (Bollywood News)

माधुरीचा 'पंचक' हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमाची माधुरीने निर्मिती केली. माधुरी ही सध्या 'डान्स दीवाने' या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे. सुनील शेट्टी देखील या कार्यक्रमाचे परीक्षण करतो. हम आपके है कौन!, तेजाब, साजन, बेटा, दिल तो पागल है, डेढ इश्किया या चित्रपटातील माधुरीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'द फेम गेम' या वेब सीरिजमधून देखील माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता माधुरीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest