क्रिती इकॉनॉमी क्लासमध्ये
क्रिती सॅनन बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्याकडे आकर्षक असे प्रोजेक्ट असून ते कधी प्रदर्शित होतात याची चाहते प्रतीक्षा करत आहेत. तिच्या चित्रपटाचे पाठोपाठ शूटिंग सुरू असून तिला त्यासाठी सतत प्रवास करावा लागतो. राबता चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू असून त्यासाठी तिने केलेल्या विमानप्रवासाचा एक व्हीडीओ सध्या व्हायरल झाला आहे. क्रिती विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत असताना या व्हीडीओतून पाहावयास मिळत असल्याने त्याकडे साऱ्यांचे लक्ष गेले आहे. या व्हीडीओमध्ये क्रिती एका छोट्या बाळाशी खेळत असल्याचे दिसते.
पापाराझ्झीमधील एक लोकप्रिय नाव असलेल्या व्हायरल भायानी याने याच विमानातील क्रितीचे हे दोन व्हीडीओ व्हायरल केलेले आहेत. याकडे लक्ष जाण्याचे पहिले कारण म्हणजे क्रिती इकॉनॉमी क्लासमधून करत असलेला प्रवास. यात तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून त्यामध्ये ती विमानातून बाहेर पडताना आपल्याला दिसते. विमानातील प्रवासी तिचा फोटो काढत असताना क्रिती मास्कने आपला चेहरा झाकून विमानातून बाहेर पडताना दिसते. दुसऱ्या व्हीडीओमध्ये ती विमानात बसली असून तिच्या उजव्या बाजूला बसलेल्या चिमुकल्याने तिचे लक्ष वेधून घेतले आहे. या चिमुकल्यासोबत क्रिती काही क्षण खेळतानाही आपल्याला पाहावयास मिळते.
दरम्यान, ८ एप्रिलला क्रितीने आपल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले असून यात तिच्यासमवेत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. या वेळी ती म्हणाली होती, जगावेगळ्या एका प्रेमकथेचे चित्रीकरण वेगात सुरू असून हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत आहे. जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजन प्रस्तुत करत असलेल्या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे, लक्ष्मण उत्तेकर आणि मॅड्डॉक फिल्म करत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.