क्रितीचे ‘वेड’ !
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा महाराष्ट्राशी संबंध आहे तो करिअरमुळे. चित्रपटातील अभिनयामुळे ती मुंबईत राहत असली तरी तिचा मराठीशी तसा संंबध नाही. ती मुळची उत्तर भारतातील. असे असूनही साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट क्रितीने नुकताच पाहिला आहे. ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. अनेक पुरस्कारही जिंकले. क्रिती सेनॉनने जवळपास पाच महिन्यांनी हा चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिली आहे.
‘वेड’ चित्रपटातील एक फोटो शेअर करत क्रिती म्हणते की, चित्रपट पाहण्यास मला खूप उशीर झाला. मला ‘वेड’ चित्रपट खूप आवडला. मित्रा, रितेश हा चित्रपट तू उत्तम दिग्दर्शित केला आहेस. अभिनय, चित्रपटातील दृश्ये सर्वच छान आहेत. रितेश आणि जेनेलिया तुम्ही प्रेमळ आहात. असेच काम करत राहा. क्रितीची या पोस्ट स्टोरीवर रिपोस्ट करत जेनेलियाने आभार मानले आहेत. रितेश व जिनिलीयाच्या या चित्रपटाने ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. जवळपास महिनाभर हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणत होता.
क्रिती आता लवकरच ‘आदिपुरुष’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने सीतेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार असून सध्या सारे कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यामध्ये नायकाच्या भूमिकेत प्रभास असून बॉलिवूडचा जानमाना अभिनेता सैफ अली खान यांचीही महत्त्वाची भूमिका चित्रपटात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.