कॅटचा देसी अवतार
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा एक जुना व्हीडीओ सोशल मीडियावर आला आहे. यात कॅटरिना चक्क झाडू मारताना दिसत आहे. हा व्हीडीओ 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. व्हीडीओच्या बॅकग्राऊंडला अक्षयकुमारचा आवाजही ऐकू येत आहे.
या व्हीडीओत कॅटरिना पांढऱ्या रंगाच्या सलवार-कुर्त्यात दिसतेय. व्हीडीओत अक्षय कॅटरिनाला ‘तू काय करतेस,’ असे विचारतो. याचे उत्तर देताना कॅटरिना 'मी साफसफाई करतेय,' असे सांगते. या व्हीडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, 'रिअल क्वीन'. दुसर्या यूजरने लिहिले, 'धर्मपत्नी'.
कॅटरिना आणि अक्षयचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ती शेवटची हॉरर कॉमेडी 'फोन भूत'मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत दिसली होती, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. आता ती लवकरच सलमान खानसोबत 'टायगर ३'मध्ये दिसणार आहे. याशिवाय कॅटरिना श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.