कंगना-दीपिकाची ‘ती’ कॅटफाईट
कंगना रणौत आणि दीपिका पदुकोण यांच्यात अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी कंगनाने दीपिकाच्या ऑस्करमधील भाषणाचे कौतुक करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता या दोन्ही अभिनेत्रींचा एक जुना व्हीडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या पैशांसाठी चित्रपट साईन करण्याविषयी बोलत आहेत.
या व्हीडीओमध्ये, कंगना पैशासाठी चित्रपट करते हे कबूल करत आहे, तर दीपिका तिच्या निवडींवर टीका करत आहे. २०१४ मधील या व्हीडीओत कंगना आणि दीपिकाशिवाय विद्या बालनदेखील दिसत आहे. जेव्हा या तिन्ही अभिनेत्रींना विचारण्यात आले की, त्यांनी कधी पैशासाठी चित्रपट साईन केला आहे का? ज्यावर दीपिका म्हणते की, तिने असे कधीही केले नाही, तर कंगनाने उत्तर दिले की तिने केवळ पैशांसाठी अनेक चित्रपट साइन केले आहेत.
मात्र, यानंतर कंगना तिच्या करिअरच्या आलेखाबद्दल स्वत:ला योग्य ठरवत म्हणाली, ‘‘माझ्या करिअरचा आलेख बघितला तर तुमच्या लक्षात येईल की, माझ्याकडे कधी चांगले चित्रपट आले आहेत तर कधी असे काही चित्रपट आले आहेत जे इतरांसाठी फारसे चांगले नव्हते. ते पुरेसे चांगले नव्हते. लग्नात डान्स करायचा की चित्रपटात काम करायचं हे ठरवावे लागले. अशा परिस्थितीचा मी अनेकदा सामना केला आहे. मला गर्दी आणि स्टेज दोन्हीची भीती वाटते. अशा परिस्थितीत चित्रपटात माझे कोणतेही विशेष पात्र नसले तरी मी ते करणे पसंत करते. चित्रपटांमध्ये काम करणे माझ्यासाठी सोपे आहे.’’
यावर दीपिका म्हणते, ‘‘दिवसाच्या शेवटी मला असे वाटते की चित्रपट तुम्हाला घडवतात. चित्रपटांची निवड, त्यातील अभिनय आणि ते हिट किंवा फ्लॉप हेच तुम्हाला घडवते. पैसे कमवण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. तुम्ही अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करू शकता. तुमचे संपूर्ण करिअर तुमच्या चित्रपटांवर अवलंबून असते. कुणी आपल्या चित्रपटांच्या निवडीबाबत रिस्क घेऊ नये असे मला वाटते.’’
व्हीडीओमध्ये विद्याही या विषयावर आपले मत मांडताना दिसत आहे. ती म्हणते, ‘‘मी माझ्या करिअरमध्ये कधीही पैशासाठी चित्रपट केले नाहीत. मी ज्या पार्श्वभूमीतून आले आहे त्यातून निवडण्याची लक्झरी माझ्याकडे आहे’’
दीपिका सध्या हृतिक रोशन आणि अनिल कपूरसोबत ‘फायटर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर कंगनाकडे 'तेजस' आणि 'इमर्जन्सी'सारखे चित्रपट आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.