इलियानाचा बेबीमून !
साऊथ गाजवलेल्या इलियाना डिक्रूझने बॉलिवूडमध्येही काही दमदार चित्रपट दिले आहेत. सध्या इलियाना गरोदरपणातील आनंद घेत असून त्यातील काही क्षण ती अनेक वेळा सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या गरोदरपणाची बातमी शेअर करताना तिने बेबी बंपचे फोटोही शेअर केले होते. या फोटोत ती काळ्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. आता इलियानाचा आणखी एक व्हीडीओ समोर आला असून तो इंटरनेटवर जबर व्हायरल होत आहे. ही क्लिप शेअर करत इलियाना डिक्रूज म्हणते की, आता मी बेबीमूनसाठी निघाले आहे.
इलियानाने इंस्टाग्रामवर बूमरँग व्हीडीओ शेअर केला असून त्यात तिच्या बेबीमून डायरीची पहिली झलक दिसते. इलियाना बेबीमूनसाठी कोठे गेली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ती परदेशात गेल्याचे दिसते. 'बेबीमून'च्या पहिल्या क्लिपमध्ये इलियाना समुद्रकिनारी असल्याची झलक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये तिच्या हातात पेयाचे ग्लास दिसत आहेत. तिसर्या क्लिपमध्ये इलियानाच्या हातात जोडीदाराचे हात दिसत आहेत. मात्र हात पकडलेली व्यक्ती कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.
'बेबीमून' दरम्यान काढलेल्या फोटोमध्ये दोघांनीही त्यांच्या अंगठ्या दाखवल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. एप्रिलमध्ये गरोदरपणाची बातमी शेअर केल्यापासून इलियानाने तिच्या बाळाच्या वडिलांच्या ओळखीबद्दल मौन बाळगलं आहे. तिच्या 'बेबीमून'वर तिच्यासोबत कोण आहे हे तिने उघड केले नाही. ही पहिलीच वेळ आहे की तिने तिच्या बाळाच्या वडिलांबद्दल काही माहिती दिली आहे. एका वृत्तानुसार इलियाना कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघेही कॅटरिना आणि विकी कौशलसोबत त्यांच्या मालदीव सहलीवेळी एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू आहेत. काही काळापूर्वी इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर ॲँड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांचे आधीच लग्न झाल्याची अफवाही पसरली होती, मात्र २०१९ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाल्याचे उघड झाले. इलियाना सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.