ठरलं तर या दिवशी रिलीज होणार राजकुमार राव चा SRI
राजकुमार राव हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या संपूर्ण बॉलीवूड प्रवासात त्याने चित्रपटांची अनोखी निवड करून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सर्वात पॉवरपॅक परफॉर्मर अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या आगामी SRI साठी सज्ज होत असून आगामी चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. स्त्री, न्यूटन यांसारख्या चित्रपटांसह त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलं आता SRI मधून तो काय वेगळं करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.
चित्रपटाची ही घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत होते आणि आता प्रतीक्षा संपली असून राजकुमार राव स्टारर SRI एका आठवड्याने पुढे ढकलल्यानंतर 17 मे 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
या आगामी बायोपिकमध्ये अभिनेता ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर यांच्यासोबत राजकुमार स्क्रीन शेयर करणार आहे. चित्रपटाची कथा एका उद्योगपती श्रीकांत भोल्लाच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती फिरते.
गुलशन कुमार आणि T-Series सोबत आणखी एक मनोरंजक कंटेंट-रिच राइडसाठी आता प्रेक्षक सज्ज होताना दिसतात. T-Series सादर करत आहे T-Series Films & Chalk N Cheese Films Production LLP, राजकुमार राव यांच्या SRI सह तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार निर्मित हिरानंदानी. SRI या वर्षी मे रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
आगामी काळात राजकुमार राव स्त्री 2, मिस्टर अँड मिसेस माही, गन्स अँड गुलाब्स सीझन 2 आणि विकी विद्या का वो वाला व्हिडिओमध्ये देखील दिसणार आहे ज्यासाठी अभिनेता तृप्ती दिमरी सोबत दिसणार आहे त्याचसाठी ऋषिकेशमध्ये शूटिंग करत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.