इब्राहिम अली खान, शनाया कपूर, अंश दुग्गल, आणि प्रगती श्रीवास्तव बॉलीवूड मधल्या नव्या कलाकारांची मांदियाळी
बॉलीवूडने काही अत्यंत प्रतिभावान अभिनेते दिले असून या मनोरंजन क्षेत्रात नवोदित कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी नेटिझन्स नेहमीच उत्सुक असतात. अनेक नवोदितांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आगामी काळात इंडस्ट्रीत असेच काही कलाकार येणार असून ते या खास प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेत. 2024 मध्ये त्यांचं बॉलीवूड पदार्पण होणार असून ते या खास प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहेत.
इब्राहिम अली खान
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान त्याच्या डेब्यू चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी दिग्दर्शित सरजमीन या चित्रपटाद्वारे इब्राहिम बॉलीवूडच्या ग्लॅमरस जगात प्रवेश करणार असून यात काजोल देखील दिसणार आहे.
शनाया कपूर
संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर तिच्या अप्रतिम लुक्सने वेळोवेळी चर्चेत असते.शनाया वृषभासोबत संपूर्ण भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे आणि मोहनलालसोबत दिसणार आहे. करण जोहरच्या 'बेधडक'मध्येही शनाया काम करत आहे. हे 2022 मध्ये होते जेव्हा तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाची घोषणा केली आणि तिचा पहिला लूक देखील शेअर केला होता.
अंश दुग्गल
नॉन-फिल्मी पार्श्वभूमीतून आलेला अंश दुग्गल हा आनंद एल राय यांच्या आगामी 'नखरेवाली' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपट निर्माते राहुल शंकल्या दिग्दर्शित हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. उल्लेखनीय म्हणजे, रोमकॉमची निर्मिती कलर येलो प्रॉडक्शनद्वारे केली जात आहे. अलीकडेच अंशने रेड कार्पेटवर पदार्पण केले आणि अंश दुग्गल त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरेल याची नेटिझन्समध्ये अपेक्षा वाढली आहे!
राशा थडानी
इंटरनेट सेन्सेशन राशा थडानी ही सदाबहार अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी आहे. ती अजय देवगण आणि त्याचा भाचा आमान देवगण यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. हा सिनेमा ॲक्शन ॲडव्हेंचर प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जात असून त्याचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार आहेत. आगामी चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नसले तरी, या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये अपेक्षेचा पल्ला उंचावला आहे. रिपोर्ट्सनुसार, ती राम चरणसोबत त्याच्या पुढील चित्रपट RC16 मध्ये देखील दिसणार आहे.
प्रगती श्रीवास्तव
परफेक्ट ऑडिशननंतर आनंद एल रायने नखरेवाली मधील आणखी एक नवी अभिनेत्री शोधली ती म्हणजे प्रगती. बॉलिवुड मध्ये तिला लाँच करून प्रगती नक्कीच इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करणार यात शंका नाही.
पश्मिना रोशन
हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन इश्क विश्क रिबाउंड नावाच्या इश्क विश्कच्या सिक्वेलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. ती रोहित सराफ, जिब्रान खान आणि नायला ग्रेवाल यांच्यासोबत दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.