'मी खूप भाग्यवान आहे. कारण, तू माझ्या सोबत आहेस'
मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ७६ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. गेली अनेक वर्ष ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत. सर्व कलाकारांचे त्यांच्याशी खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. सोशल मीडियावरून त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत होता. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनीही त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली.
अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची लव्हस्टोरी नेहमीच चर्चेत असते. त्यांनी आणि अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अनेकदा ते एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट लिहिली. त्यांनी त्यांचा आणि अशोक सराफ यांचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.
फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “हॅपी बर्थडे माय डार्लिंग… मी खूप भाग्यवान आहे की, तू माझा जोडीदार आहेस. तू माझा मित्र आहेस, माझा मार्गदर्शक आहेस, तू सगळं काही आहेस. लव्ह यू.” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
निवेदिता सराफ यांच्या या पोस्टवर अशोक व निवेदिता सराफ यांचे चाहते आणि त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्स करत अशोकमामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.