ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनास हिच्या 'अनफिनिश्ड' या पुस्तकाचं हिंदी रूपांतर आता जागतिक पुस्तक मेळ्यात दाखल
प्रियांका चोप्रा जोनासच्या "अभी बाकी है सफर" या पुस्तकाचं नुकतच हिंदी रूपांतर #WorldBookFair2024 मध्ये दिसणार असल्याचं कळतंय. या बातमीने पुस्तकाच्या प्रकाशनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रसिकांमध्ये आणि साहित्य रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
अनफिनिश्ड हे फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्रजीमध्ये प्रकाशित झाल होत आणि आता या पुस्तकाने खूप प्रेम प्रशंसा मिळवली आहे. प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री आणि जागतिक आयकॉन प्रियंका चोप्रा जोनासच्या बालपणापासून ते मनोरंजन उद्योगात प्रसिद्धी मिळवण्यापर्यंतच्या प्रवासाची एक झलक आहे.
हिंदीमध्ये या पुस्तकाचं अनुवाद करण्याचा निर्णय झाला असून तिच्या चाहत्यांना तिचा प्रवास जवळून अनुभवता आला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे. #WorldBookFair2024 मध्ये "अभी बाकी है सफर" ची मागणी देखील तितकीच आहे. ग्लोबल आयकॉन म्हणून असलेली तिची ओळख ही अभिनयाच्या पलिकडचा तिचा प्रवास दाखवून देते. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्ष तिच्या प्रवासाची गोष्ट यातून उलगडत जाते.
#WorldBookFair2024 हा एक प्रसिद्ध वार्षिक कार्यक्रम आहे जो जगभरातील प्रकाशक, लेखक आणि पुस्तक प्रेमींना आकर्षित करतो. या प्रतिष्ठित मेळ्यात ‘अनफिनिश्ड’चे हिंदी रूपांतर लाँच करण्यात आलं असू शकतो प्रियांका चोप्रा साठी हि उल्लेखनीय बाब आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.