हॅपी बर्थ डे, सुहाना!
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचे प्रचंड प्रमाणात चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शाहरुखची कन्या असल्याने ती आता स्टार झाल्यासारखे आहे. सोमवार, २२ मे रोजी सुहाना खानने आपला २३ वा वाढदिवस साजरा केला. यामुळे सुहानावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. सुहानाला तिच्या दिसण्यावरून खूप ट्रोल केले गेले आहे. सुहाना खानला तिच्या सावळ्या रंगावरून नेहमीच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण एकदा सुहानानं ट्रोलर्सवर चांगलाच पलटवार केला होता. एक पोस्ट शेअर करत आणि तिच्या रंगावरनं तिला हिणवणाऱ्यांना तिने चांगलेच सुनावले होते.
सुहानाने एक स्क्रीन शॉट शेअर केला असून ज्यामध्ये कमेंट करत तिच्या रंगावरनं तिला हिणवलं होतं. तिने ही पोस्ट करत तिच्या ट्रोलिंगचा देखील खुलासा केला होता. पोस्ट शेअर करत सुहाना म्हणते की, येथे खूप काही सुरू आहे आणि या समस्येला सुधारण्याची गरज आहे. ही गोष्ट केवळ माझ्याबाबतीत नाही तर, त्या सगळ्या तरुण मुले आणि मुलींसंदर्भात आहे. ज्यांना कोणत्याही कारणाशिवाय विनाकारण आपल्या आयुष्यात या अशा कटू भावनांचा सामना करावा लागतो. ती पुढे म्हणते की, इथे काही कमेंट्स आहेत, ज्या माझ्या सावळ्या रंगावरनं केल्या आहेत. जेव्हा मी १२ वर्षांची होती, तेव्हापासून माझ्या सावळ्या रंगावरून अनेक महिलांनी आणि पुरुषांनी मी चांगली दिसत नाही असं मला तोडावर सुनावले होते. मात्र, मी त्याकडे लक्ष दिले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.