कॅटकडे गूड न्यूज!
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे बाॅलिवूडमधील चर्चित कपलपैकी एक. कोणत्या ना कोणत्या कारणाने हे दोघे सतत चर्चेत असतात. अलीकडे कॅटरिना रमजान ईदनिमित्त अनेक पार्ट्यांमध्ये सहभागी झाली. त्यापैकी एका ईद पार्टीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर कॅटरिना प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्माच्या घरी असलेल्या ईद पार्टीमध्ये कॅटरिना सहभागी झाली होती. त्यावेळचा तिचा व्हीडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कॅटरिना प्रेग्नंट आहे अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की कॅटरिना तिच्या ओढणीनं तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
कॅटरिना आणि विकी हे २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्या दोघांच्या लग्नानंतर अनेक वेळा कॅटरिना प्रेग्नंट आहे अशा चर्चा सुरू होत्या. अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मानं नुकतंच त्यांच्या घरी या ईद पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. कॅटरिनानं यावेळी सैल कपडे परिधान केले होते. पापाराझ्झींना पाहताच कॅटरिना त्यांना पोझ देण्यासाठी समोर उभी राहिली. पण पोझ देत असताना ती सतत तिची ओढणी सांभाळताना दिसली आणि तिचा हात सतत ती पोटाच्या समोर घेऊन येत होती. त्यामुळे कॅटरिना प्रेग्नंट आहे, या चर्चेला पेव फुटले. ‘‘कॅटरिना ओढणीच्या मदतीनं आणि हाताच्या साहाय्यानं बेबी बंप लपवत होती, असं नेटकरी म्हणत आहेत. कॅटरिनाचा हा व्हीडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.