दीप-वीरकडे गुड न्यूज!
आता या अफवांच्या दरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या जवळच्या व्यक्तीने पुष्टी दिली आहे. दीपिकाच्या जवळच्या व्यक्तीने ‘द वीक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या गरोदरपणाची पुष्टी केली आहे. तसेच एका जवळच्या मित्राने सांगितले की दीपिका तिच्या दुसऱ्या तिमाहीत आहे. म्हणजेच दीपिकाच्या प्रेग्नेंसीला चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच दीपिका पदुकोणने एका मुलाखतीत लवकरच कुटुंब सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आई बनण्याचा काही विचार आहे का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर दीपिका म्हणाली होती, ‘‘नक्कीच, रणवीर आणि मला मुले खूप आवडतात. आम्ही दोघेही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा आम्ही आमचे कुटुंब सुरू करू.’’
दीपिका पदुकोणने २०१८मध्ये रणवीर सिंहसोबत लग्न केले होते. दोघांची पहिली भेट 'गोलियों की रासलीला : रामलीला' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एकत्र काम करत असताना दोघेही प्रेमात पडले आणि पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. दीपिका आणि रणवीर ‘ गोलियों की रासलीला: रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘८३’ मध्ये एकत्र दिसले आहेत. याशिवाय दीपिकाने रणवीरच्या ‘सर्कस’ या चित्रपटातही कॅमिओ केला आहे. नुकताच दीपिकाचा ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये ती हृतिक रोशनसोबत आहे. दीपिकाचे आगामी काळात ‘सिंघम अगेन‘ आणि ‘कल्की 2898 एडी’ असे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.