गॅब्रिएला संतापली
अर्जुन रामपाल हा बॉलिवूडमधील एक वैशिष्ट्यपूर्ण अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयाबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळेही तो नेहमी चर्चेत असतो. गेले अनेक महिने तो मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला डेट करत असून काही दिवसांपूर्वी गॅब्रिएलाने गरोदर असल्याचंही जाहीर केलं होते. आता मात्र ती नेटकऱ्यावर चांगलीच संतापली आहे.
गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि अर्जुन रामपाल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत आहेत. अनेक ठिकाणी ते एकत्र दिसतात. याचबरोबर सोशल मीडियावरून ते आपले एकमेकांवरील प्रेम सातत्याने व्यक्त करत असतात. असे असूनही या दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही. दोघे विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच गॅब्रिएला बाळाला जन्म देणार आहे. यावरून काही दिवसांपासून त्यांना ट्रोल केले जात आहे. या ट्रोलिंगला कंटाळून नेटकर्याच्या एका प्रश्नावर गॅब्रिएलाने सडेतोड उत्तर दिले आहे.
गॅब्रिएलाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिचा बेबी बम्प दाखवताना दिसत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करत प्रतिक्रिया दिली. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, तुम्ही लग्न कधी करणार आहात ? तू भारतामध्ये राहते. तुझा जेथे जन्म झाला तेथे तू राहात नाहीस. आपण जेथे राहतो तेथील काही नियम, संकेत पाळण्याची गरज असते. तुम्ही सगळे येथील तरुणाईची मानसिकता खराब करत आहात.
यावर गॅब्रिएला गप्प बसली नाही. ती म्हणते की, हो. येथल्या लोकांची मानसिकता सुंदर जिवांना या जगात आणून खराब केली आहे. मागासलेल्या मानसिकतेच्या लोकांकडून मानसिकता खराब झालेली नाही. गॅब्रिएलाची ही प्रतिक्रिया आता चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या प्रतिक्रियेवर अनेकांनी उत्तर देत तिची बाजू घेत आपले मत मांडलं आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.