काँग्रेसची गोठवलेली बँक खाती पुन्हा सुरू
त्यापूर्वी काँग्रेसने पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप शुक्रवारी सकाळी केला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आयकर विभागाने आमची बॅंक खाती गोठवली असून युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून २१० कोटी रुपयांची रिकव्हरी मागितली आहे.
आम्हाला गुरुवारी माहिती मिळाली की बँकांनी पक्षाने दिलेले धनादेश थांबवले आहेत. ते आमचे चेक क्लिअर करत नाहीत. काँग्रेस पक्षाची खातीही गोठवण्यात आली आहेत. याशिवाय क्राउड फंडिंग खातीही गोठवण्यात आली आहेत. सध्या आमच्याकडे वीज बिल भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खाती गोठवल्यामुळे केवळ भारत जोडो न्याय यात्रेचे नियोजन कोलमडले आहे. पक्षाच्या सर्व राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे. हे लोकशाही गोठवण्यासारखे आहे, असा आरोप अजय माकन यांनी केला होता.
क्राउडफंडिंगचे पैसे आयकर विभागाने गोठवले....
ज्या आधारावर हे खाते गोठवले जातात ते आणखीनच हास्यास्पद आहे. आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून २१० कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. हा पैसा कोणत्याही भांडवलदाराचा नाही. हे पैसे आम्ही ऑनलाइन क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उभे केले आहेत. क्राउड फंडिंगमधून सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. यापैकी अनेकांनी प्रत्येकी १०० रुपयांपेक्षा कमी देणगी दिली आहे. लोकांनी यूपीआयच्या माध्यमातून पैसे जमा केले आहेत. युवक काँग्रेसचा पैसा हा युवक काँग्रेसच्या सदस्यत्वातून गोळा केलेला पैसा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सरकारने हा पैसा आयकराच्या माध्यमातून गोठवला आहे, असा आरोपदेखील माकन यांनी केला.
सरकारला काय दाखवायचे आहे?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल आणि खऱ्या अर्थाने दुःखही होईल. भारतात लोकशाही पूर्णपणे संपली आहे. लोकशाही बंद पडली आहे. १४ फेब्रुवारी रोजी आम्हाला माहिती मिळाली की बँका आमच्याकडून दिलेले चेक क्लिअर करत नाहीत. आम्ही अधिक तपास केला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की देशातील प्रमुख विरोधी पक्षाची खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाच्या खात्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. खाती गोठवली आहेत. आपली लोकशाही लॉकडाऊनमध्ये आहे. काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली नाहीत, तर लोकशाही गोठवली गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला जेमतेम दोन आठवडे शिल्लक राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाची खाती गोठवून या सरकारला काय दाखवायचे आहे, असा सवालही माकन यांनी खाती गोठवल्यावर केला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.