'आदिपुरुष'च्या १० हजार तिकिटांचे मोफत वितरण

बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. प्रभास, क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला आदिपुरुष सिनेमा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 09:07 am
'आदिपुरुष'च्या १० हजार तिकिटांचे मोफत वितरण

'आदिपुरुष'च्या १० हजार तिकिटांचे मोफत वितरण

बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. प्रभास, क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत असलेला आदिपुरुष सिनेमा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी आदिपुरुष चित्रपटाची तिकिटे फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक अग्रवाल या चित्रपटाच्या तब्बल १० हजार तिकिटांचे मोफत वाटप करणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

“श्री राम यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेमुळे मी आदिपुरुष चित्रपटाची १० हजार तिकिटे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणमधील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लोकांना ही तिकिटे देण्यात येतील,” असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी मोफत तिकिटासाठी गुगल फॉर्मची लिंकही ट्वीटमध्ये शेअर केली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे, तर क्रिती सेनॉन सीता मातेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story