स्वराबाबत ‘फेक अलर्ट’!
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. राजकीय किंवा सामाजिक विषयावरही ती आपली मते ठाम मांडत असते. चित्रपटांतील अभिनयापेक्षा तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटनांमुळे ती चर्चेत असते. स्वरा भास्करने अलीकडे म्हणजे या वर्षाच्या फेब्रुवारीत समाजवादी पक्षाचे नेते फवाद अहमदसोबत लग्न केले. लग्नानंतर स्वराला चाहते, मित्र-मैत्रिणी आणि हितचिंतकांनी खूप शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर स्वराला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. आता स्वरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नानंतर चार महिन्यांनी सोशल मीडियावर स्वराबाबतची बातमी व्हायरल होत आहे. आता पुन्हा एकदा स्वराविषयीची एक बातमी व्हायरल होत आहे. या बातमीत स्वरा भास्कर गरोदर असून ती जुलै महिन्यात आई होऊ शकते, असे म्हटले आहे. मात्र, लग्नाला केवळ चार महिने झाले असताना हे कसे काय शक्य आहे, याची अनेकांना शंका आली. त्यातच स्वराचा पती पती फवाद अहमदने या बातमीला दुजोरा दिला असून जुलैमध्ये प्रसूती होऊ शकते, असे म्हटले आहे. स्वराने तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या फवादशी लग्न केले आहे. खरे तर, ट्विटरवर न्यूज २४ च्या नावाने केलेल्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर समोर आला आहे. दुसरीकडे अयोध्येचे महंत राजू दास यांनीही स्वराबाबत आक्षेपार्ह ट्विट केले आहे.आता न्यूज २४ च्या ऑफिशियल अकाउंटवरून या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करून ही बातमी खोटी असल्याचे सांगितलं जात आहे. न्यूज २४ ने अशी कोणतीही बातमी दिली नाही. न्यूज २४ ने ट्विट केले की, 'फेक अलर्ट.... त्यामुळे शंका आल्यावर या बातमीची सत्यता तपासली असता ही बातमी खोटी असल्याचे आढळले. त्यामुळे स्वरा भास्कर गरोदर नसून तिच्या गरोदरपणाची खोटी बातमी पसरवली जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.