उद्योजक कृष्णा श्रॉफ हिने पटकावला 'वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कार
भारतात तिने मार्शल आर्ट्स लोकप्रिय बनवले आणि तरुणांना तिच्या स्वत:च्या प्रवासातून प्रोत्साहन दिलं आहे. दक्षिण आशियातील अग्रगण्य MMA जाहिरातींपैकी एक मॅट्रिक्स फाईट नाइट (MFN) आणि सेलिब्रिटी-आवडते जिम MMA मॅट्रिक्सची स्थापना करणाऱ्या कृष्णाने 'वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे.
पुरस्कार प्राप्त करताना कृष्णा म्हणते " हा पुरस्कार माझ्यासाठी "अविश्वसनीय ओळख" आहे. अत्यंत पुरुषप्रधान उद्योगात (फिटनेस आणि एमएमए) मी काम करून नावलौकिक कमावलं आहे. विविध आव्हानांचे स्वागत खुल्या हातांनी करून थोडीशी जोखीम पत्करली आहे "
इव्हेंट मधल्या या कृष्णाचा तिच्या भाषणाने लक्ष वेधून घेतल आहे. कृष्णाने आपल्या देशातील तरुणांमध्ये फिटनेस लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि MMA च्या खेळावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.