इमरान हाश्मीचा शोटाइम चा ट्रेलर रिलीज
इमरान हाश्मी हा ओ जी अभिनेता म्हणून तर ओळखला जातो आणि हा अभिनेता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत असून अलीकडे त्याच्या नवीन प्रोजेक्ट "शोटाइम" चां ट्रेलर रिलीज झाला आहे. मनोरंजन उद्योगात या ट्रेलर च्या चर्चा होताना दिसतात. टायगर 3 च्या यशानंतर शोटाईम ही नवी कोरी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चाहते या साठी उत्सुक आहेत.
इमरान हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया वर शोटाइमचा अधिकृत ट्रेलर शेअर केला असून प्रेक्षकांना आता नव्या शो बद्दल उत्कंठा लागून आहे. नसीरुद्दीन शाह आणि विजय राज यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसह, तसेच मौनी रॉय, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसह पडद्यावर ग्रेस करण्यासाठी इमरान हाश्मी सज्ज आहे.
इमरान हाश्मी आगामी तेलगू आणि हिंदी भाषेतील ॲक्शन चित्रपट ओजी आणि तेलगू स्पाय थ्रिलर गुडाचारी 2 मध्ये दिसणार असून तो लवकरच वतन मेरे वतन मध्ये एक भूमिका करताना दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.