इमर्जन्सी लॅंडिंग
विमानात किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्यपाने ही परिस्थिती ओढवली. मात्र, आयुष्यात प्रथमच अशा घटनेला सामोरे जावे लागल्याने रश्मिका प्रचंड घाबरली होती. यामुळे अपघातातून बचावल्याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली.
रश्मिका ज्या फ्लाइटने मुंबईहून हैदराबादला जात होती, त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या प्रकरणाची माहिती देताना रश्मिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिचा अनुभव शेअर केला आहे.
रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामअकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिच्यासोबत साऊथ अभिनेत्री श्रद्धा दासही दिसत आहे. फोटो शेअर करताना रश्मिकाने लिहिले की, ‘‘फक्त तुम्हाला सांगायचे आहे... आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून वाचलो.' या फोटोमध्ये रश्मिका आणि श्रद्धा फ्लाइटचा फूटबोर्ड दिसत आहेत.
रश्मिकाने हा फोटोही शेअर केला आहे ज्यात ती फूटबोर्ड दाबताना दिसत आहे. याप्रकरणी फ्लाइटच्या प्रवक्त्याचे काही वेगळेच म्हणणे आहे. फ्लाइट पायलटच्या म्हणण्यानुसार, ‘‘हे प्रकरण रश्मिकाने सांगितले होते तितके मोठे नव्हते. होय, फ्लाइटमध्ये काही समस्या होती, जी वेळेत तपासली गेली.’’ डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, रश्मिका ज्या फ्लाइटमध्ये प्रवास करत होती त्या फ्लाइटला तांत्रिक बिघाड आणि गोंधळामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही.
रश्मिकाचा संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'ॲनिमल' गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. यामुळे ती रातोरात नॅशनल क्रश बनली. रश्मिकाचा नुकताच प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता ती याच वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा २’ या चित्रपटातही दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.