घरात पूजा केल्याने देवोलीना ट्रोल

देवोलीना भट्टाचार्य हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. देवोलीना भट्टाचार्यची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. देवोलीना भट्टाचार्यला खरी ओळख ही 'साथ निभाना साथीया' या मालिकेतून मिळाली आहे.  

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 9 Jul 2024
  • 04:00 pm
Devolina Bhattacharya, Worship of Satyanarayana

संग्रहित छायाचित्र

देवोलीना भट्टाचार्य हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. देवोलीना भट्टाचार्यची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. देवोलीना भट्टाचार्यला खरी ओळख ही 'साथ निभाना साथीया' या मालिकेतून मिळाली आहे.  देवोलीना भट्टाचार्य ही टीव्ही मालिकांमध्ये गेल्या १३ वर्षांपासून काम करत आहे.  देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि  व्हीडीओ शेअर करताना दिसते. देवोलीनाने नुकताच एक व्हीडीओ शेअर केला आहे.

त्यामुळे लोक तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. देवोलीनाला टीव्ही मालिकांमध्ये काम करून १३ वर्षे पूर्ण होत असल्याने तिच्या घरी एका पूजेचे आयोजन करण्यात आले होते. घरी सत्यनारायण पूजेनंतर खास जेवणही तिने तयार केले. यावेळी ती होम हवन करतानाही दिसत आहे. मात्र, सर्व पूजा देवोलीना भट्टाचार्य ही एकटीच करत आहे. पूजेनंतर तिने खास केक कट करूनही सेलिब्रेशन केल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे. यात पूजा करताना कुठेही तिचा पती दिसत नाही. मात्र, केक कट करताना तिचा पती दिसत आहे.  

या व्हीडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, सत्यनारायणची पूजा पतीसोबत मिळू करतात. हिने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केले, फक्त लोकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या पूजा वगैरे करते. दुसऱ्याने लिहिले की, या देवोलीना भट्टाचार्यने हिंदू धर्माचा अपमान केला आहे. काहीही करते ही…तिसऱ्याने लिहिले की, तू मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केलेस.  तू हे असे नाटक नेमके का करते हेच मला मुळात कधी कळत नाही. लोक या व्हीडीओनंतर सतत देवोलीना भट्टाचार्य हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. लोकांना देवोलीनाने अशाप्रकारे पूजा करणे अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. देवोलीनाने काही दिवसांपूर्वीच दोन लग्न केल्याने अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका केली. यानंतर अरमान मलिकची पहिली पत्नी अर्थात पायलने देवोलीनाचा व्हीडीओ शेअर करत सूड उगवला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story