‘छोटा भाई है मेरा’
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, सध्या या चित्रपटाचे आणि त्यातील सारा-विकीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली असून सध्याही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचत आहे. सारा अली खानने नुकताच कुटुंबासह हा चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहिला. यावेळी साराची आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान दोघेही उपस्थित होते.
इन्स्टाग्रामवर सध्या सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये सारा आपल्या भावाचे पापाराझ्झींपासून रक्षण करताना पाहावयास मिळते. इब्राहिम अली खान साराबरोबर चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर त्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरले.
प्रथमच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागलेला इब्राहिम प्रथम काहीसा गोंधळला. त्याचा हाच व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. पापाराझ्झींच्या गर्दीत इब्राहिम कार शोधत असताना म्हणतो की, तुम्ही माझ्याकडे येऊ नका, तुमची हिरोईन तेथे उभी आहे.” एकंदरीत इब्राहिम कॅमेरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता.
सारा अली खानला भावाचा गोंधळ उडाल्याचे कळल्यावर ती “बाबा, इब्राहिम कुठे आहे? इब्राहिम…” अशा जोर-जोरात हाका मारत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे. सारा पापाराझ्झींबरोबर फोटो काढण्यात व्यस्त होती आणि इब्राहिम कार शोधत होता. यामुळे दोघे वेगवेगळे झाले होते. इब्राहिम दिसल्यावर, साराने त्याला कारमध्ये बसवले आणि स्वतःच दरवाजा बंद केला. त्यानंतर ती पापाराझ्झींना म्हणाली की, “छोटा भाई है मेरा”
भावा-बहिणीचे नाते पाहून नेटकऱ्यांनी दोघांचेही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी “सारा अली खान अगदी तिच्या आईप्रमाणे आपल्या भावाची सतत काळजी घेताना दिसते” अशा प्रतिक्रिया व्हीडीओवर टाकल्या आहेत. साराप्रमाणे इब्राहिम अली खानसुद्दा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.