Bollywood News: भूमीचा धक्का!

भूमी पेडणेकरची (Bhumi Pednekar) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही एवढी लोकप्रियता तिने आपल्या अभिनयाद्वारे कमावली आहे. तिने काही चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्या असल्या तरी त्यात वेगळेपण होते हे तिचे चाहते,

संग्रहित छायाचित्र

येत्या काही दिवसांत भूमीचा 'भक्षक' नावाचा चित्रपट येतोय

भूमी पेडणेकरची (Bhumi Pednekar) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही एवढी लोकप्रियता तिने आपल्या अभिनयाद्वारे कमावली आहे. तिने काही चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्या असल्या तरी त्यात वेगळेपण होते हे तिचे चाहते, नेटकरीही मान्य करतील. भूमीच्या 'थँक यू फॉर कमिंग' नावाच्या चित्रपटातील भूमिकेचं जेवढं कौतुक झालं तेवढीच त्यावर टीकाही झाली होती.

येत्या काही दिवसांत भूमीचा 'भक्षक' (Bhakshak) नावाचा चित्रपट येत असून त्यात ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचारांमुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. त्याच्या व्हायरल ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. भक्षकमध्ये भूमीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरही दिसणार आहे. तिनं या चित्रपटामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारे भक्षकचे प्रमोशन सुरू आहे. त्यात एका प्रमोशन इव्हेंटमध्ये भूमीनं तिला वयाच्या १४ व्या वर्षी एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जावे लागल्याचे सांगितले. आपण कुटुंबासमवेत असूनही गर्दीतला तो अनुभव घेतला आणि मोठा धक्काच बसल्याचे भूमीने म्हटलं आहे. ती म्हणते की, मी काहीच बोलू शकत नव्हते आणि कुणाला काही सांगूही शकत नव्हते. मात्र त्या गोष्टीचा माझ्यावर मोठा परिणाम झाला होता. तो प्रसंग घडला तेव्हा मी अवघ्या १४ वर्षांची होते. आम्ही कुटुंबातील सगळेजण बांद्र्याला एका यात्रेत गेलो होतो. त्याचवेळी तो प्रसंग घडला. कुणीतरी मला वाईटपद्धतीनं स्पर्श करून गेले होतं. मी पटकन मागे वळून पाहिले, मला काही समजलेच नाही. (Bollywood News)

पुढे ती सांगते, आम्ही जिकडे गेलो होतो तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हात सुटल्यास चुकण्याची भीती होती. अशा परिस्थितीत माझ्यासोबत जे घडलं ते खूपच भयानक होतं. पुढील कित्येक दिवस तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. सोसायटीतील माझ्या मित्रांसोबतही मी बोलू शकत नव्हते, एवढा मला त्या गोष्टीचा धक्का बसला होता, असे भूमी सांगते. भूमीच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तिचा भक्षक चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवरून प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये सई ताम्हणकर, आदित्य श्रीवास्तव आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story