देशातले महत्त्वाचे मुद्दे संपलेत का?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आयशाच्या फोटो आणि व्हीडीओने अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी आयशाच्या लूकला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशातच आता ट्रोलर्सला आयशाने सडेतोड उत्तर दिले आहे. आयशाने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले की, "मी हे सांगू इच्छिते की, दोन दिवसांपूर्वी मी गोव्याला जाण्यासाठी निघाले होते. माझ्या फॅमिलीमध्ये मेडिकल इमर्जन्सी आली होती. माझी बहीण हॉस्पिटलमध्ये आहे. या सगळ्यामध्ये मला आठवते की, मला एअरपोर्टवर पॅप्सने थांबवले होते आणि मी काही वेळ त्यांना फोटोसाठी पोज दिल्या. माझ्या लूकला ट्रोल करण्याशिवाय देशात इतर कोणतेही महत्त्वाचे मुद्दे नाहीयेत, असे मला वाटत आहे. मी कसे दिसायला हवे होते किंवा कसे दिसायला नको यावरील लोकांच्या हास्यास्पद मतांचा भडिमार झाला. गेट ओव्हर मी यार, मला कोणतेही चित्रपट करण्यात किंवा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यात शून्य रस आहे. मी माझे आयुष्य आनंदाने जगत आहे, कधीही प्रसिद्धीच्या झोतात राहू इच्छित नाही, कोणत्याही प्रसिद्धीमध्ये मला रस नाही, मी कोणत्याही चित्रपटात येऊ इच्छित नाही. त्यामुळे कृपया माझी अजिबात काळजी करू नका, असेही आयशाने पोस्टमध्ये लिहिले आहे. पुढे आयशाने पोस्टमध्ये लिहिले की, १५ वर्षांनंतरही एखादी मुलगी ती जशी किशोरवयात दिसत होती, तशीच आता दिसावी ही अपेक्षा करणे, हास्यास्पद आहे. मला एक शानदार जीवन लाभले आहे आणि मला तुमच्या मतांची गरज नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.