"स्वातंत्र्य वीर सावरकर" मध्ये झाकळणार अंकिता लोखंडे
बिग बॉस 17 मध्ये गौरवशाली प्रवास संपल्या नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे "स्वातंत्र्य वीर सावरकर" या नव्या चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा ठरली असून 22 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी देशभक्तीपर आधारित चित्रपटात अंकिता रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे.
स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे स्टारर स्वातंत्र्य वीर सावरकर 22 मार्च 2024 रोजी मोठ्या पडद्यावर येणार असल्याचं कळतंय.
बिग बॉस 17 मध्ये यशस्वीपणे चाहत्यांची आणि फॉलोअर्सची मने जिंकल्यानंतर अंकिता लोखंडे आता तिच्या चित्रपटाच्या रिलीज साठी सज्ज होताना दिसते आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.