अमिताभ अयोध्येत
‘बिग बीं’च्या आगमनावेळी मंदिरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १९ दिवसांपूर्वी झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही अमिताभ यांनी मुलगा अभिषेकसोबत हजेरी लावली होती. यावेळी अमिताभ एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. अमिताभ यांनी रामलल्लाच्या दरबारात सुमारे 30 मिनिटे पूजा केली. यानंतर ते मंदिरातून बाहेर पडले आणि सर्किट हाऊसवर पोहोचले.
अमिताभ हे मुलगा अभिषेकसोबत २२ जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी झाले होते. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदींनी भाषण केलं. यानंतर मंदिर परिसरात अमिताभ बच्चन यांच्या ते बोलले. ‘बिग बीं’नी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. सोहळ्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली.प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर, बिग बींनी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या राम मंदिरात असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीसह स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, ‘‘बोलो सियापति रामचंद्र की जय.’’
त्यांच्या ब्लॉगवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची छायाचित्रे शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले, “दिव्य भावना की प्रासंगिकता से भरा एक दिन... अयोध्या में प्राणप्रतिष्ठा समारोह से वापस... महिमा उत्सव और विश्वास की आस्था... मंदिर की गणना में डूबा हुआ श्री राम के जन्म पर... इससे अधिक कुछ नहीं कहा जा सकता... क्योंकि आस्था का कोई वर्णन नहीं होता...’’
अमिताभ यांनी अयोध्येतील राम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी १४.५ कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केला आहे. अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे जन्मलेल्या अमिताभ यांनी 'द सरयू' मध्ये ही गुंतवणूक केली आहे, मुंबईस्थित डेव्हलपर ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्या ५१ एकरमध्ये पसरलेल्या 'द सरयू'मध्ये १० हजार स्क्वेअर फूटाचा प्लॉट त्यांनी घर बांधण्यासाठी खरेदी केला आहे. 'द सरयू' राम मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर तर अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३०मिनिटांच्या अंतरावर आहे.‘‘अयोध्या या शहराला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. इथे परंपरा आणि आधुनिकता एकत्र राहतात. या जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बनवण्याचाही मी विचार करत आहे,’’ असे अमिताभ यांनी यापूर्वी नमूद केले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.