संग्रहित छायाचित्र
मेगास्टार अमिताभ बच्चन तब्बल २५ वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत आहेत. या शोने अमिताभ बच्चन यांचे नशीब पालटले. दरवर्षी चाहते मोठ्या उत्साहाने रिॲलिटी शोची वाट पाहात असतात. ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची सुवर्ण संधी आणि तीदेखील अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळते. आता लवकरच १६ वा सीझन सुरू होणार असून शोच्या नवीन सीझनसाठी नोंदणीही सुरू झाली आहे. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये अमिताभ बच्चन यांनी या शोसाठी किती मानधन घेत आहे, ते जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
कौन बनेगा करोडपतीचा पहिला सीझन २००० मध्ये सुरू झाला होता. त्यावेळी बक्षिसाची रक्कम एक कोटी एवढी होती. तर दुसऱ्या सिझनमध्ये ती ५ कोटी करण्यात आली. मात्र, चौथ्या सिझनमध्ये ही बक्षीस रक्कम पुन्हा एक कोटी झाली. त्यासोबत, एक जॅकपॉट प्रश्न ठेवण्यात आला होता ज्यातून स्पर्धक ५ कोटी रुपये जिंकू शकतात. 'कौन बनेगा करोडपती'च्या पहिल्या सीझनची सुरुवात अमिताभ बच्चन यांनी केली आणि तेव्हा त्यांनी प्रतिएपिसोड २५ लाख रुपये फी घ्यायचे. या सीझनमध्ये अनेक मोठे स्टार्स झळकले आहेत. शाहरुख खान, राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर दिसले होते. पण तिसरा सीझन प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बींनी होस्ट न करता शाहरुख खानने होस्ट केला होता.
पाचव्या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी बिग बी एक कोटी रुपये घेत होते. हा हंगाम २०११ मध्ये आला होता. नंतर त्यांची फी वाढवायला सुरुवात झाली. त्यांनी सीझन ६ साठी प्रत्येक एपिसोडसाठी १.५ कोटी रुपये आणि सीझन ७ साठी २ कोटी रुपये आकारले.
कौन बनेगा करोडपतीचा सीझन ८ खूप गाजला तर प्रत्येक एपिसोडसाठी बिग बींनी २ कोटी रुपये घेतले होते. तर अमिताभ बच्चन यांनी सीझन ९ साठी प्रत्येक एपिसोडसाठी २.६ कोटी रुपये आकारले. त्यानंतर सीझन १० साठी प्रत्येक एपिसोडसाठी बिग बी ३ कोटी रुपये घेत होते. तर सीझन ११, १२ आणि १३ मध्ये बिग बींची फी सारखीच होती. एका एपिसोडसाठी त्यांनी साडेतीन कोटी मानधन घेतले होते. मग बिग बींनी १४ व्या सीझनसाठी मोठी फी आकारली होती. त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी ५ कोटी रुपये घेतले होते. 'कौन बनेगा करोडपती' सीझन १५ प्रचंड हिट ठरला होता. तेव्हा पण त्यांनी ५ कोटी घेतले होते. आता १६ वा सीझन येतोय. अनेकांना करोडपती बनवणारे अमिताभ बच्चन गेल्या काही वर्षांमध्ये नक्कीच करोडपती झाले आहेत.