बडे मियाँ छोटे मियाँ टायटल ट्रॅक मध्ये अक्षय आणि टायगर ची खास केमेस्ट्री दिसणार
बॉलीवूडचे ॲक्शन सुपरस्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी ॲक्शन-पॅक फ्लिक 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधल टायटल ट्रॅक नुकतच रिलीज झालं असून अक्षय आणि टायगर यांची खास केमिस्ट्री यातून बघायला मिळणार आहे. उत्तम अभिनयाच्या सोबतीने कमाल डान्स करणारी ही प्रसिद्ध ही जोडी जगभरातील चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.
धडधडणाऱ्या बीट्स आणि मनमोहक लय ही या टायटल ट्रॅक ची खासियत आहे. चित्रपटाच्या थरारक कथानकासह डान्स फ्लोअरवर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची केमिस्ट्री यातून हायलाइट होणार आहे. दोघांनी या बद्दलचा उत्साह सोशल मीडिया वर शेयर केला आहे.
विशाल मिश्रा यांनी तयार केलेल आणि अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणं गायलं आहे. हे गीत इर्शाद कामिल यांनी लिहिलेले आहेत आणि बॉस्को-सीझर यांनी नृत्यदिग्दर्शित केले आहे.
पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित, बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे खिलाडी कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार, टायगर श्रॉफ, या ईदमध्ये त्यांचा 'टायगर इफेक्ट' प्रदर्शित करत असलेल्या रोमांचकारी राइडसाठी तयार व्हा!
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.