दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 च्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये अदिती राव हैदरी चा स्टायलिश अंदाज
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024 हा चित्रपट उद्योगातील सर्वात उल्लेखनीय आणि प्रभावशाली व्यक्तींना सन्मानित करणारा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार साजरा केला जातो. अष्टपैलू अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठित दीपप्रज्वलन समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होती.
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने तिच्या विविध अभिनयाने भारतीय चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये उत्तम काम केलं आहे. हे सिनामिका, ज्युबिली, ताज: डिव्हाइड बाय ब्लड, कात्रु वेलीदाई आणि अश्या बऱ्याच प्रोजेक्ट्स मधून तिने सगळ्यांची मन जिंकली आहे.
प्रतिभा आणि समर्पणाच्या तेजाचे प्रतीक असलेल्या दीपप्रज्वलन सोहळ्याने अदितीची भारतीय चित्रपटसृष्टीतील अमूल्य भूमिका प्रदर्शित केली. या सन्मानाने तिच्या रोमांचक आगामी प्रकल्पांना देखील सूचित केले ज्यात तिचे कोक स्टुडिओ 2 तमिळमधील संगीतमय पदार्पण आणि विजय सेतुपती आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत 'गांधी टॉक्स', इंडो-ब्रिटिश चित्रपट 'लायनेस' आणि अनेक चित्रपटांचा समावेश आहे. संजय लीला भन्साळी यांची बहुप्रतिक्षित Netflix वेब सिरीज 'हीरामंडी' प्रोजेक्ट्स येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.