अभिनेता राजकुमार राव ठरतोय दिग्दर्शकांची पहिली निवड
पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार राव ठरतोय डायरेक्टर फर्स्ट चॉइस
राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमार राव हा बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतोय. संपूर्ण मनोरंजन प्रवासात राजकुमारने स्वत:ला एक अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे आणि म्हणून तो पॉवर-पॅक परफॉर्मर बनला आहे. त्याने त्याच्या आशयसंपन्न चित्रपटांनी सर्वांना प्रभावित केले आहे आणि ते पुढेही करत राहतो. राजकुमार राव सध्या दिग्दर्शकांची पहिली पसंती देखील ठरतोय.
नाटक , कॉमेडी , रोम-कॉम्स किंवा बायोपिक्स राजकुमार राव हा कायम प्रो अभिनेता ठरला असून विविध शैलींचा अभिनय करण्याचे गुण त्याचात आहेत आणि या कारणाने आज तो डायरेक्टर फर्स्ट चॉइस ठरला आहे. सिनेमा उद्योगातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. ट्रॅप्ड, न्यूटन, भीड, काई पो चे सारख्या चित्रपटांचा एक भाग असल्याने राजकुमार सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू आयकॉन ठरला आहे आणि त्याने हे सिद्ध करून दाखवलं आहे. अमर कौशिक, अमित मसूरकर, अनुभव सिन्हा आणि इतरांसोबत काम करून राजकुमार हा पॉवरपॅक अभिनेता तर आहे आणि भविष्यात अनेक बड्या दिग्दर्शकांना त्याच्यासोबत आणखी काम करण्याची इच्छा देखील आहे.
व्यावसायिक आघाडीवर राजकुमार राव काही सर्वात उत्तम प्रोजेक्ट्स वर काम करताना दिसतोय. ‘श्री’ नावाचा आणखी एक बायोपिक पाइपलाइनमध्ये असून राजकुमार ऋषिकेशमध्ये त्याच्या ‘विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ’ या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. जो एक आगामी रोम-कॉम आहे आणि तृप्ती दिमरी या नवीन इंटरनेट सेन्सेशनसोबत त्याचा पहिला चित्रपट आहे. स्त्री 2 त्याचा आगामी रोमँटिक ड्रामा मिस्टर अँड मिसेस माही बायोपिक 'श्री' आणि थ्रिलर 'गन्स अँड गुलाब सीझन 2' सोबत त्याच्या चाहत्यांना हास्याच्या रोलरकोस्टरवर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.