ॲक्शन पॅक्ड क्रॅक!
जीतेगा तो जीएगा’ या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी (दि. ९) रिलीज झाला. दोन मिनिटे २१ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये विद्युत जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसला. त्याचा 'डेअर टू बेअर' लूक याआधी कधीच दिसला नव्हता.
अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल यांच्या फेस ऑफ सीनची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमध्ये नोरा फतेही आणि विद्युत यांची रोमँटिक केमिस्ट्री नजरेत भरणारी ठरली. आदित्य दत्त या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
‘क्रॅक : जीतेगा तो जीएगा’च्या ट्रेलरची सुरुवात दोन भावांच्या नात्याने होते. पुढे ट्रेलरमध्ये विद्युतचा कधीही न पाहिलेला अवतार दिसतो. तो जबरदस्त हाय इंटेंसिटी ॲक्शन सीन्स करताना दिसतो. विद्युत कधी बीएमएक्स सायकलिंग करताना, कधी रोलरब्लेडिंग, तर कधी हाताने लढताना दिसतो.
अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल यांच्या फेस ऑफची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमध्ये नोरा फतेहीसोबत विद्युत जामवालचे रोमँटिक सीन्स खिळवून ठेवणारे आहेत. ॲमी जॅक्सन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत फाईट सीन करताना दिसली. थोडक्यात या चित्रपटात ॲक्शन, रोमान्स आणि इमोशन्सचा मसाला ठासून ठरल्याचे दिसून येते. ‘काहींना त्यांच्या प्रेमासाठी खेळायचे आहे, काहींना भावासाठी खेळायचे आहे. शर्यतीचा एकच नियम असेल, जो जिंकेल तो जगेल...’ हा संवाद चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, हे सुचित करतो. एक से बढकर एक ॲक्शन सीन्स आणि प्रभावी संवाद असलेला हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी राजी देशभरात रिलीज होत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.